शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

झुंबराच्या प्रकाशाने विद्यापीठाची इमारत उजळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 19:39 IST

विद्यापीठाच्या इमारतीवर झालेल्या खर्चाची चर्चा इंग्लंडच्या राणीच्या दरबारात झाली होती.

पुणे: पुण्याचा ऐतिहासिक ठेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाच्या भव्य इमारतीच्या दुरूस्तीचे काम पूर्ण झाले आहे. ब्रिटीश कालीन झुंबरांमुळे या इमारतीमधील विविध सभागृहांची शोभा अधिक वाढली असून आकर्षक रोषणाईने इमारत पुन्हा एकदा उजळून निघाली आहे.विद्यापीठाच्या इमारतीवर झालेल्या खर्चाची चर्चा इंग्लंडच्या राणीच्या दरबारात झाली होती. इमारती उभारणीसाठी झालेले खर्च पाहून ब्रिटीश सरकारने या इमारतीचे बांधकाम करणाऱ्या अभियंत्याची बदली ऑस्ट्रेलिया येथे केली होती. त्या काळात एखाद्या अधिकाऱ्याची बदली ऑस्ट्रेलिया येथे करणे म्हणजे एक प्रकारे शिक्षाच मानले जात होते. त्यामुळे विद्यापीठाच्या इमारती मागे मोठा इतिहास आहे.त्याच प्रमाणे विद्यापीठाच्या इमारतीमध्ये असणाऱ्या  वस्तूंनाही खूप महत्त्व आहे. ब्रिटिशांनी इमारतीचे काम पूर्ण केल्यानंतर इंग्लंडमधील डेव्हीड विल्किनसन या कंपनीच्या भारतामधील कलकत्ता येथील एफ अँण्ड सी ऑशलर या शाखेतून झुंबर खरेदी केले होते. बेल्जियन ग्लासेसचा वापर करून हे झुंबर तयार करण्यात आले होते.सध्य स्थितीत या प्रकारचे झुंबर मिळणे दुर्मिळच आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इख्य इमारतीच्या दुरूस्तीचे काम 10 ते 15 वर्ष सुरू होते.  विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.नरेंद्र जाधव यांच्या कार्यकालात दुरूस्तीच्या कामाला सुरूवात झाली आणि माजी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्या कार्यकालात काम पूर्ण झाले. दुरूस्तीच्या कामामुळे इमारतीमधील भव्य-दिव्य झुंबर व विविध पोस्टर्स सुरक्षित ठिकाणी काढून ठेवण्यात आले होते.दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर विद्यापीठाने झुंबर बसविण्यासाठी तज्ज्ञ कारागिरांचा शोध घेतला.त्यानंतर मुंबई येथील त्रिवेणी लाईटस्ला झुंबर बसविण्याचे काम देण्यात आले. हे काम पूर्ण झाले आहे.आता मुख्य इमारतीच्या सभागृहात बसविलेल्या झुंबरांच्या प्रकाशामुळे सभागृह उजळून निघाली आहेत.विद्यापीठाच्या इमारतीमधील ज्ञानेश्वर सभागृहात 3, सरस्वती सभागृहात 8 आणि शिवाजी सभागृहात 3 अशी एकूण 14 झुंबरं पुन्हा एकदा बसविण्यात आल्यामुळे इमारतीची शोभा अधिक वाढली असल्याचे दिसून येत आहे. सध्याच्या बाजार भावाचा विचार केला तर या झुंबरांची किंमत एक ते दीड कोटी रूपर्यांपर्यंत जाऊ शकते,असे विद्यापीठाच्या अधिका-यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठ