शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

विद्यापीठ प्रशासन विद्यार्थिकेंद्रित व्हावे - प्रसेनजित फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 02:29 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेच्या व्यवस्थापन प्रतिनिधी व पदवीधर प्रतिनिधी पदासाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गज उमेदवार रिंगणात उतरल्याने ती चर्चेची ठरली होती.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेच्या व्यवस्थापन प्रतिनिधी व पदवीधर प्रतिनिधी पदासाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गज उमेदवार रिंगणात उतरल्याने ती चर्चेची ठरली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलतबंधू प्रसेनजित फडणवीस हे नोंदणीकृत पदवीधरच्या खुल्या गटातून विजयी झाले. या पार्श्वभूमीवर, त्यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला.प्रसेनजित फडणवीस म्हणाले, मी अनेक वर्षे विद्यार्थी चळवळीत काम केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांशी माझा जवळून संबंध आलेला आहे. अधिसभा सदस्य म्हणून काम करताना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीवर माझा भर राहणार आहे.विद्यापीठ हे धोरणकेंद्रित न बनता विद्यार्थीकेंद्रित बनले पाहिजे. आज विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्या समस्या अधिसभेच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत.दरवर्षी विद्यापीठातून पदवी घेऊन लाखो पदवीधर बाहेर पडतात. पदवीखेरीज त्यांच्या हातात इतर कोणतेही कौशल्य नसल्याने त्यांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. विद्यार्थी पदवीचे शिक्षण घेत असताना त्यांना विविध कौशल्य अभ्यासक्रम शिकवले जाणे, ते शिकत असतानाच विविध कंपन्यांशी संपर्क साधून त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात. कंपन्यांनाही प्रशिक्षित मनुष्यबळाची मोठी गरज असते. त्यासाठी विद्यापीठाकडून पुढाकार घेऊन समन्वयाची भूमिका बजवावी, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.मी ‘सायबर सिक्युरिटी’ या विषयावर काम करतो. सध्या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. इंटरनेटच्या वाढत्या वापराबरोबरच त्याद्वारे फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमणात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे सायबर सिक्युरिटी या विषयाबाबत जास्तीत जास्त जनजागृती होणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी मोफत वाय-फायच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात, मात्र त्या सुरक्षित आहेत का, याची तपासणी करणे आवश्यक ठरते. ‘‘फुकट मिळते ते सगळेच पौष्टिक नसते’’ यानुसार त्याची खात्री करून घेतली जाणे आवश्यक आहे. त्यामुळे याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण होणे आवश्यक आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सायबर सिक्युरिटीबाबत जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.मी यापूर्वी रात्र प्रशालेच्या संस्थेवर सचिव म्हणून काम केले आहे. नोकरी करीत शिक्षण घेणारा मोठा वर्ग समाजात आहे. नोकरी करताकरता शिक्षण घेऊन त्यांनी स्वत:चे भवितव्य घडविल्याची अनेक उदाहरणे मी पाहिली आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून नोकरी करत विद्यार्थ्यांना शिकता यावे यासाठी बहि:स्थ अभ्यासक्रम चालविला जातो. या बहि:स्थ अभ्याक्रमांकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याचा विचार आहे. त्याला माझ्याकडून १०० टक्के प्राधान्य दिले जाईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अंदाजपत्रक मोठे आहे. केंद्र व राज्य शासनाकडून विद्यापीठाला कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतो. विद्यापीठाला विविध प्रकल्पांसाठी मिळणाºया सर्व निधीचा पुरेपुरे वापर व्हावा, याकडे लक्ष दिले जाणार आहे. हा निधी वेळच्या वेळी खर्च झाल्यास तो परत जाणार नाही.विद्यापीठाशी संबंधित आणखी अनेक विषय आहे, त्याची माहिती करून घेऊन त्यावर काम करायला आम्हाला आवडेल. प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्यानंतर आणखी नवनवीन गोष्टींची माहिती होत जाईल. अधिसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक राजकीय नेत्यांचे नातेवाईक रिंगणात उतरले होते. मात्र निवडून आलेल्यांनी आपापल्या संस्थांचे हित जपण्यासाठी अधिसभेच्या सदस्यपदाचा गैरवापर न करता विद्यार्थी हितासाठी तो जास्तीत जास्त केला जावा. मी यापूर्वी अनेक वर्षे विद्यार्थी चळवळीत काम केले, त्या माध्यमातून अधिसभेवर निवडून येण्याची संधी मला मिळालेली आहे. निवडणूक संपली आहे. अधिसभेला राजकीय आखाडा बनविला जाऊ नये. अधिसभेचा सदस्य म्हणून काम करीत असताना सर्वांनी विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवूनच कार्यरत राहावे, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठeducationशैक्षणिक