शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताप्रमाणे कडक अंमलबजावणी अमेरिकेत नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 19:10 IST

भारतीय नागरिकांनी कोरोनाच्या वाढत्या प्रसाराचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारी आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे. 

ठळक मुद्देअमेरिकेत कोरोनाबाधित रुग्णांमधे ३० ते ६० वयोगट असणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण सर्वाधिक

पुणे: चीनमधून कोरोनाचा संसर्ग होण्यास सुरुवात झाली. आता हा विषाणू संपूर्ण जगात थैमान घालत आहे. तर सद्यस्थितीत अमेरिकेत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. इटलीमध्ये दिवसेंदिवस हा कोरोना होणा?्या रूग्णांमध्ये वाढ होत चालली आहे. आता अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात ४० हजाराहून आधिक कोरोना रुग्ण आहेत. तर फ्लोरिडा मध्ये २ हजार ५०० पेक्षा जास्त कोरोनाबाधित आढळून आले आहेत. अमेरिकेत अजूनही संचार बंदी घोषित केली नाही. पण इतर व्यवसाय, कंपनी बंद ठेवण्यात आल्या आहेत. पण भारताप्रमाणे कडक अंमलबजावणी केली नाही.असे मत अमेरिकेत राहणाऱ्या रोहित गायकवाड याने 'लोकमत' शी बोलताना व्यक्त केले.  संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा उद्रेक झाला असून कोरोनामुळे होणारा कोविड १९ आजार झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अमेरिकेसारखा विकसित देश यामध्ये प्रथम क्रमांकावर आला आहे. भारत सरकारने इतर देशांची परिस्थिती पाहता संचार बंदी घोषित केली आहे. भारतीय नागरिकांनी कोरोनाच्या वाढत्या प्रसाराचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारी आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे. रोहित म्हणाला, अमेरिकेत अजूनही संचार बंदी घोषित केली नाही. पण इतर व्यवसाय, कंपनी बंद ठेवण्यात आल्या आहेत. पण भारताप्रमाणे कडक अंमलबजावणी केली नाही. जीवनावश्यक वस्तू बरोबरच रेस्टॉरंट आणि हॉटेल्स येथे उघडी आहेत. नागरिकांना रस्त्यावर फिरण्यासही मुबा देण्यात आली आहे. पण भारत सरकारने परिस्थिती हाताबाहेर जाण्याअगोदर कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेतले आहे. अमेरिकेची लोकसंख्या भारतापेक्षा कमी आहे. त्यामुळे आपल्या लोकसंख्येचा विचार करता नागरिकांनी सरकारी आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे. अमेरिकेत कोरोनाबाधित रुग्णांमधे ३० ते ६० वयोगट असणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण सर्वाधिक आहे. तर त्यापाठोपाठ ६० वषार्पुढीलही ज्येष्ठ लोकांमध्ये वाढ होत चालली आहे. न्यूयॉर्कची परिस्थिती इतकी वाईट झाली आहे. की, एक व्हेंटिलेटरवर दोन रुग्णांना ठेवावे लागत आहे. हॉस्पिटलमध्ये बेडची कमतरता भासू लागल्याने रुग्णांना कॉरिडॉरमध्ये झोपण्याची वेळ आली आहे. अमेरिकन सरकार जीवनावश्यक वस्तूंचा साठा करून देत नाही. त्यामध्ये एका कुटुंबाला मर्यादित वस्तूच दिल्या जातात. असेही त्याने सांगितले.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाIndiaभारत