शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
3
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
4
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
5
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
6
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
7
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
8
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
9
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
10
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
11
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
12
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
13
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
14
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

भूलेश्वर मंदिरात गणरायाचे आगळेवेगळे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 02:24 IST

मंदिरामधील वैैभवाकडे अभ्यासक होताहेत आकर्षित

भूलेश्वर : संपूर्ण राज्यात एक जागृत देवस्थान व पुणे जिल्ह्यात शिल्पसौंदर्याचा खजिना म्हणून ओळख असणाऱ्या पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस येथील श्रीक्षेत्र भूलेश्वर मंदिरात गणरायाचे विविध रूपात दर्शन होते. या विविध रूपातील गणरायाचे दर्शन घेण्यासाठी गणेशोत्सवाच्या काळात हजारो भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून भूलेश्वर मंदिरास भेट देतात.श्रीक्षेत्र भूलेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारापासूनच गणपतीची विविध रूपे पाहावयास मिळतात. पुढच्या बाजूला असणाºया नगारखान्याच्या एका मनोºयात एक उभी असणारी गणपती मूर्ती दिसते. या मूर्तीच्या पोटाभोवती नागबंध आहे. ही मूर्ती चुनखडीमध्ये बनवलेली असून पेशव्यांचे गुरु ब्रम्हेंद्रस्वामी यांनी १७ व्या शतकात भूलेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यावेळेस या मूर्तीची स्थापना केली आहे. मंदिरावर असणाºया तिनही शिखरांवर गणेश मूर्ती वेगवेगळ्या आसनात आहेत व प्रत्येक मूर्तीच्या पोटाभोवती नागबंध आहे.पुढे आल्यानंतर, मंदिरातील दगडी जिना चढनू वर आल्यावर डाव्या बाजूला एका खांबावर एक गणेशमूर्ती दिसते. याचे वेगळेपण म्हणजे योगासन केल्याप्रमाणे डाव्या पायावर उभी असून उजवा पाय डाव्या पायाच्या गुडघ्यावर टेकवला आहे.दोन्ही हाताने उजव्या पायाचा गुडघा धरला आहे. याला शक्ती गणपती म्हणतात. भूलेश्वर गर्भगृहातील शिवपिंडीचे दर्शन करून बाहेर आल्यानंतर प्रदक्षिणा मार्गाकडे जाताना दक्षिण दरवाजाजवळ एका खांबावर एक गणेश मूर्ती दोन्ही हात व पाठ छताला लावलेली दिसते.दिवसेंदिवस श्री क्षेत्र भूलेश्वर देवस्थानकडे भाविकांची गर्दी वाढत चालली आहे. पूर्वीच्या काळापासून येथील गणेश मूर्तींच्या दर्शनासाठी हजारो भाविक येतात. येथील गणेश मूर्ती वेगवेगळ्या रूपात आढळतात. विशेष म्हणजे, स्त्री रुपातील गणेशदर्शन फक्त याच ठिकाणी घेता येते. यामुळे गणेश उत्सव काळात हजारो भाविक येथील गणेश मूर्तीचे दर्शन घेतात. - अरुण यादव, अध्यक्ष,श्री क्षेत्र भूलेश्वर देवस्थानप्रदक्षिणा मार्गावर मकर तोरणे दिसतात. सप्तमातृकांच्या मुर्ती दिसतात. गणेशाचे स्त्री रुपसुद्धा पाहावयास मिळते. ही मूर्ती पद्मासन घालून आसनस्थ व चतुर्भुज आहे. खाली मूषक वाहन आहे. ब्रह्मा, विष्णू, महादेव, कार्तिकेय अशा विविध देवतांच्या सुद्धा स्त्रीरूपातील मूर्ती आढळतात. देवी सहस्त्र नामावलीमध्ये विनायकी, लंबोदरी, गणेश्वरी असा नामोल्लेख आढळतो. तर शिल्परत्न ग्रंथात शक्ती गणपतीचा उल्लेख आढळतो.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवPuneपुणे