शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

शिक्षणासाठी पालावर भरतेय बिनभिंतीची शाळा!, एक अनोखा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 03:04 IST

ज्या समाजात पिढीजात शिक्षण नाही, दर काही महिन्यांनी त्यांची राहण्याची जागा बदलते, कामाचं ठिकाण बदलतं, रोज मजुरी मिळेलच याची खात्री नाही, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, गरिबी आणि शिक्षणाचा अभाव अशा एक ना अनेक समस्यांचा सतत ससेमिरा झेलत जीवन जगणारा समाजातील असा एक उपेक्षित घटक म्हणजे पोतराज.

- सुनील जगतापउरुळी कांचन : ज्या समाजात पिढीजात शिक्षण नाही, दर काही महिन्यांनी त्यांची राहण्याची जागा बदलते, कामाचं ठिकाण बदलतं, रोज मजुरी मिळेलच याची खात्री नाही, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, गरिबी आणि शिक्षणाचा अभाव अशा एक ना अनेक समस्यांचा सतत ससेमिरा झेलत जीवन जगणारा समाजातील असा एक उपेक्षित घटक म्हणजे पोतराज.अशा उपेक्षित समाजाच्या आयुष्यात नवचैतन्य आणण्याचे काम सोरतापवाडी येथील सामाजिक कार्यकर्त्या प्रांजली चौधरी (ढगे) या करीत आहेत. प्रांजली या समाजातील नव्या पिढीला अक्षरओळख करून देऊन त्यांच्या आयुष्यातील अज्ञानाचा अंधकार दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्या समाजात एक नवचैतन्य आणायचे काम करीत आहेत. यामागे त्यांचे प्रयोजन काय असे विचारले असता, केवळ आनंद व या उपेक्षित समाजाची शैक्षणिक परवड थांबविताना मिळणारे मानसिक समाधान वेगळेच असल्याचे मत प्रांजली चौधरी (ढगे) यांनी व्यक्त केले.याबद्दल अधिक माहिती देताना प्रांजली म्हणाल्या, की आमच्या वस्तीवर डोंगराच्या बाजूला असलेल्या माळरानावर आपली पालं टाकून ही दहा-बारा कुटुंबं दरवर्षी काही काळ राहायला येतात. यात एक वर्ष वयापासून अठरा-वीस वयाच्या मुला-मुलींचा समावेश आहे. मात्र, त्यांचा अबकड या मराठी भाषेतील बाराखडीतील अक्षरांशी कसलाच संबंध आलेला नसल्याने दैनंदिन जीवनात वावरताना त्यांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते आणि काही वेळा फसवणूक, अडवणूक वा काही अपमानालाही सामोरं जावं लागतं.या गोष्टी ध्यानात घेऊन प्रांजली चौधरी (ढगे) यांनी त्या खासगी कंपनीतील आपले काम संपवून घरी आल्यावर या मुला-मुलींशी जवळीक साधून त्यांची शिक्षणाच्याबाबतीत काय अडचण आहे व ती कशी दूर करायची, याबाबत माहिती घेतली आणि नंतर त्यांच्या अनपढ आई-वडिलांशी चर्चा करून त्यांना दररोज सायंकाळी अबकड शिकवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या माळावरच्या बिनभिंतीच्या शाळेत एक एक करत जवळपास २५ मुलं-मुली शिकू लागली व त्यांच्या आयुष्याच्या नव्या बदलाची खरी सुरुवात झाली.कामाचं चीज होतंयया शाळेत शिकायला वयाची अट नसल्याने एक लग्न झालेली जोडीपण अबकड शिकत आहे आणि आपली मुले शिकत असताना बघून त्यांचे अशिक्षित आई-वडील पण समाधानी झाल्याचा वेगळाच अनुभव या ठिकाणी पाहायला मिळत आहे.त्यांचा अनुभव विचारला असता त्या म्हणाल्या, की मुलांना शिक्षणाची आवड आहे. अभ्यासाची गोडीही निर्माण झाली आहे आणि मुलांची लिखाण व वाचनात छान प्रगती होत असताना दिसत आहे. त्यांचे अक्षरही मोत्यासारखे आहे. मुलांची आकलनशक्ती वाढलेली आहे. त्यांच्यातील सुप्त गुण हळूहळू विकसित होत असताना दिसत आहेत. यामुळे आपण करीत असलेल्या कामाचं चीज होत आहे, याचं समाधान काही वेगळंच आहे. प्रांजलीच्या कार्यामुळेअनेक निरागस मुलांच्या आयुष्यात सोनेरी पहाट येऊन त्यांच्या आयुष्याला नवीन कलाटणी मिळेल हे मात्र निश्चित.

टॅग्स :educationशैक्षणिकPuneपुणे