शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सोनी एन्टरटेन्मेंटवर अनोखा ‘पॉवर कपल’ शो

By admin | Updated: December 13, 2015 23:52 IST

नाट्यमय रिअ‍ॅलिटी शोमधील तोचतोपणा पाहून कंटाळलेल्या भारतीय टेलिव्हिजन प्रेक्षकांना नवीन शोचा अनुभव मिळू लागला आहे. या माध्यमातून शोजचा दर्जा उंचावणार आहे.

नाट्यमय रिअ‍ॅलिटी शोमधील तोचतोपणा पाहून कंटाळलेल्या भारतीय टेलिव्हिजन प्रेक्षकांना नवीन शोचा अनुभव मिळू लागला आहे. या माध्यमातून शोजचा दर्जा उंचावणार आहे. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरचा ‘पॉवर कपल’ हा असाच वेगळ््या धाटणीचा रिअ‍ॅलिटी शो आहे.या शोचे सूत्रसंचालन बॉलिवूडची आकर्षक जोडी मलायका अरोरा खान आणि अरबाज खान करीत आहेत. ‘पॉवर कपल’ हा खरे प्रेम दर्शवणारा शो असून, जोडपी त्यांचे एकमेकांवर असलेले प्रेम सिद्ध करण्यासाठी काय करूशकतात, हे या शोमध्ये चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.प्रत्युषा बॅनर्जी - राहुल राज सिंग, नावेद जाफरी- सईदा, जेस्सी रंधवान- संदीप सोपारकर, अपूर्व अग्निहोत्री-शिल्पा सकलानी, आमीर अली- संजिदा शेख, डेलनाज इराणी- पर्सी करकरिया, सलील अंकोला- रिया बॅनर्जी, शावर अली-मर्सेला, अश्मित पटेल-मेहक चहल आणि राहुल देव - मुग्धा गोडसे या जोडप्यांनी शोमध्ये सहभाग घेतला आहे.प्रेम, विश्वास, संयम, श्रद्धा, त्याग, शौर्य, तडजोड अशा अस्सल प्रेमाच्या सर्व कसोट्यांवर त्यांचे प्रेम पारखून घेतले जाणार आहे. आतापर्यंत अत्यंत आनंदाने राहत असलेल्या या जोड्यांना शारीरिक, मानसिक व भावनिक पातळ््यांवरदेखील तोलून घेतले जाणार आहे. यांच्या मनात एकमेकांसोबत असण्याविषयी संभ्रम निर्माण होतो का, हे पाहिले जाणार आहे. गेमला अधिक उत्साहवर्धक करण्याकरिता दर आठवड्याला जोडपे इतरांना वोट करतील आणि एक जोडी शोमधून बाहेर पडेल.मलायका- अरबाज एकत्रपॉवर कपल हा सध्या भारतीय टेलीव्हिजनवरच्या अनोख्या शोपैकी एक शो आहे. या माध्यमातून मलायका आणि अरबाज टेलीव्हिजन इंडस्ट्रीत एकत्र पर्दापण करत आहेत. प्रत्येक जोडप्याची एक अद्वितीय व आकर्षक कथा आहे आणि शो प्रेक्षकांना त्यांच्या जीवनाची झलक दर्शविणार आहे.- अनुप विश्वनाथन, एसव्हीपी व मार्केटिंग हेड (सोनी एन्टरटेन्मेंट टेलीव्हिजन)एकत्रितपणे सूत्रसंचालनाची पहिलीच वेळएकत्रितपणे सूत्रसंचालन करण्याची आमची पहिलीच वेळ आहे. इतर जोडप्यांप्रमाणे मलायका आणि माझीसुद्धा परीक्षा घेतली जाणार असल्याची खात्री आहे.- अरबाज खान, शोचा सूत्रसंचालक (अभिनेता)गोव्याच्या निसर्गरम्य परिसरात ‘व्हिला’ : गोव्याच्या निसर्गरम्य ठिकाणी एक सुंदर व्हिला तयार करण्यात आला आहे. जेथे जोडपे संपूर्ण सीझनभर जगापासून दूर नयनरम्य वातावरणात वास्तव्य करणार आहेत. येथे ते एकमेकांना किती ओळखतात, हे सिद्ध करण्याकरिता प्रेमाच्या विविध परीक्षा देणार आहेत. प्रत्येक टास्कपूर्वी जोडीमधील एक जण त्यांच्या जिंकण्याविषयीचे भाकीत करणारे ‘ट्रस्ट पॉइंट’ सांगेल. जर जोडीदाराने टास्क यशस्वीरीत्या पूर्ण केले, तर जोडी पॉइंन्ट जिंकेल, पण जर ते हरले, तर पॉइंट्स कमी होतील. सर्जनशीलता उत्तमच प्रोग्रामिंगमधील सोनीचे सर्वात मोठे सामर्थ्य म्हणजे, अकाल्पनिक कन्टेटमध्ये आम्ही सुरुवातीपासूनच अग्रेसर राहिलो आहोत. ‘झलक दिखला जा’, ‘बिग बॉस’, ‘खतरों के खिलाडी’ यांसारखे रिअ‍ॅलिटी शो आम्ही केले आहेत. अकाल्पनिक क्षेत्रामधील ‘पॉवर कपल’ हा नवीन शो आहे. - एनपी सिंग, सीईओ (मल्टी स्क्रीन मीडिया)