शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

...अन् साकारले अनोखे पुस्तक!

By admin | Updated: May 6, 2017 02:40 IST

कोणी इंजिनिअर, कोणी डॉक्टर तर कोणी परिचारिका... आपापला उद्योग-व्यवसाय सांभाळून साहित्य चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवण्याच्या

प्रज्ञा केळकर सिंग / लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : कोणी इंजिनिअर, कोणी डॉक्टर तर कोणी परिचारिका... आपापला उद्योग-व्यवसाय सांभाळून साहित्य चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवण्याच्या दृष्टीने ते एकत्र आले... वाचन आणि लेखनावृद्धीसाठी त्यांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला... आठवड्याला एक विषय निवडायचा आणि त्यावर उत्स्फूर्त लेखन करायचे, असे ठरवून त्यांची छान भट्टी जमली आणि पाहता पाहता या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचे समूह पुस्तकच साकारले! उत्स्फूर्त लेखनाचा लेखाजोखाच या ग्रुपने ‘शब्दपालवी’ या समूह पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.सध्याची पिढी साहित्यापासून दूर चालली आहे, अशी ओरड होत असतानाच सोशल मीडियाच्या जमान्यात वाचन आणि लेखनाला चालना देण्याच्या दृष्टीने तरुण पिढी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. फेब्रुवारी महिन्यात अशाच वाचनवेड्या तरुण-तरुणींनी एकत्र येऊन ‘वाचनवृद्धी आणि अनुभवकथन’ हा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला. साहित्य, समीक्षा, चित्रपट यांसह इतर अनेक क्षेत्रातील लोक यामध्ये सहभागी झाले. एरव्ही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप म्हटला, की शुभेच्छा, गुड मॉर्निंगचे मेसेज, फॉरवर्डेड मेसेज यांना ऊत येतो. या ग्रुपने मात्र सुरुवातीपासूनच काही नियम ठरवून घेतले होते. इतर कोणतेही मेसेज पाठवण्यापेक्षा या ग्रुपवर केवळ स्वत:चे लेखन पोस्ट करायचे, असे ठरले. ‘वाचनवृद्धी’साठी ‘लेखनवृद्धी’ आवश्यक असल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. अ‍ॅडमिनने सर्वांना आठवड्याला एक विषय द्यायचा आणि त्यावर प्रत्येकाने आपल्या सर्जनशीलतेतून निर्मिलेले लेखन ग्रुपवर लिहायचे, असा दंडकच घालून देण्यात आला. आठवड्याभरात जे लिहिणार नाहीत, त्यांना समूहामधून बाहेर काढण्यात आले. न लिहिणाऱ्यांना लिहिते करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. या स्पर्धांमधील निवडक लेखनही पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहे. प्रा. ज्ञानेश्वर भोसले आणि अभिजित सोनावणे यांनी पुस्तकाचे संपादन केले असूून, ना. सी. फडके यांच्या कन्या गीतांजली जोशी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.विषयांचे वैविध्य, भाषेच्या विविध लकबी, आशयाचे अनेक रंग, लेखकांच्या भूमिका, विसंवादातून घडणारा संवाद अशा नानाविध प्रकारचे लेखन ‘शब्दपालवी’मध्ये साकारले आहे. विशेष म्हणजे, पुस्तक छपाईपासून प्रकाशनापर्यंतचा सर्व खर्च समूहामधील सदस्यांनी एकत्र येत पेलला आहे. समूहातील सदस्यांसाठी विनोदी कथा स्पर्धा, माय सिक्स वर्ड स्टोरी अशा अनोख्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.नाशिक, सांगली, नांदेड, औरंगाबाद, पंढरपूर, पुणे, पालघर, नगर, नाशिक, गोवा, दुबई, पश्चिम बंगाल अशा विविध ठिकाणी राहणाऱ्या १७ ते ८० वयोगटातील स्त्री, पुरुष, बहुलिंगी अशा सर्व सदस्यांनी लेखनाचा जणू वसाच घेतला. आॅक्टोबर महिन्यात या समूहवासीयांचे छोटेसे संमेलन पुणे विद्यापीठात पार पडले आणि त्यातूनच समूह पुस्तकाची संकल्पना साकारली आहे.प्रत्येक वाचकामध्ये एक लेखकही दडलेला असतो. या लेखकाला व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न ‘शब्दपालवी’ या पुस्तकातून करण्यात आला आहे. वाचन आणि लेखनवृद्धीसाठी तयार करण्यात आलेल्या ‘वाचनवृद्धी आणि अनुभवकथन’ या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून उदयाला आलेले लिखाण एकत्र करून हे समूह पुस्तक साकारले आहे.- अभिजित सोनावणे