शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बालक-पालक सहलीचा थिटेवाडीत अनोखा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 01:24 IST

शासकीय नियमानुसार सहल नेताना खूप अडचणी येतात, त्यामुळे छोट्या पटसंख्या असलेल्या शाळांना सहल घेऊन जाणे अवघड व नियमबाह्य होते.

केंदूर - शासकीय नियमानुसार सहल नेताना खूप अडचणी येतात, त्यामुळे छोट्या पटसंख्या असलेल्या शाळांना सहल घेऊन जाणे अवघड व नियमबाह्य होते. त्यावर मात करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थिटेवाडीचे मुख्याध्यापक मंगेश गावडे व सहशिक्षिका विमल थोरात यांनी पालकांची बैठक घेऊन बालक-पालक सहलीचे नियोजन केले.सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारी, दि.१७ रोजी एकविरा देवी, गगनगिरीमहाराज मठ, महड गणपती तसेच अलिबाग येथील नागाव बिच इत्यादी ठिकाणी नेण्यात आली. एका बालकाबरोबर एक पालक असल्याने कुठल्याही प्रकारची अडचण अथवा समस्या उद्भवली नाही. खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसमधून विद्यार्थी व पालकांना घेऊन सहल कोकणदर्शनासाठी गेली. विविध प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊन निसर्गाचा आनंद विद्यार्थ्यांबरोबर पालकांनीही अनुभवला.खेडेगावातील शेतकरी कुटुंबातील पालक व विद्यार्थी यांच्या दृष्टीने ही सहल म्हणजे एक अविस्मरणीय क्षणांची शिदोरीच ठरली. विद्यार्थ्यांबरोबर आईवडील, आजीआजोबा यापैकी एक पालक सोबत असल्यामुळे शाळेच्या सहलीबरोबर घरच्या व्यक्तीसमवेत फिरण्याचा मनमुराद आनंद विद्यार्थ्यांनी घेतला.आपापल्या पालकाकडून विद्यार्थ्यांनी आपले बालहट्टही पुरवून घेतले. समुद्रकिनाऱ्यावर घोडागाडीत बसणे, समुद्रकिनाऱ्यावरील पाण्यामध्ये खेळणे, वाळूच्या सुंदर कलाकृती बनविणे, सुंदर अशा हॉटेलमध्ये एकत्र जेवणाचा लाभ विद्यार्थ्यांसमवेत पालकांनीदेखील घेतला.शाळेतील मुलांबरोबर आपल्या पाल्यांला पाठविण्यास अनेक पालकांचा विरोध असतो, कारण तो प्रथमच आई-वडिलांना सोडून अनोळखी वातावरणात जात असतो. शिक्षकांनी कितीही काळजी घेतली तरी पालकांचा त्यावर विश्वास कमी असतो. त्यामुळे पालकांसहच सहल हा नविन उपक्रम चांगला असल्याचे पालकांनी सांगितले.पालकांमधून शिक्षकांचे कौतुकएका आगळ्यावेगळ्या सहलीचे म्हणजेच ‘बालक-पालक सहली’चे उत्कृष्ट आयोजन मंगेश गावडे व शाळेच्या सहशिक्षिका विमल थोरात यांनी केल्यामुळे पालकांमधून दोन्ही शिक्षकांचे कौतुक होत आहे. या सहलीसाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर थिटे व सर्व सदस्य, पालक यांनी फार मोठे मोलाचे सहकार्य केले. अशाप्रकारे बालक-पालक सहलीचे आयोजन कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी पर्वणीच ठरणार आहे.

टॅग्स :Puneपुणे