शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर अनोखी कारवाई; गाढवासोबत सेल्फी काढून सोशल मीडियावर प्रसिध्द 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 13:40 IST

आगळ्यावेगळ्या कारवाई मुळे विनाकारण बाहेर फिरणाऱ्या युवकांना आळा

ठळक मुद्देपुणे ग्रामीण पोलीस दलातील स्पेशल कमांडोची तुकडी ही लोणी काळभोर परिसरात दाखल

कदमवाकवस्ती :  मी जनतेचा दुश्मन आहे.मी प्रशासनाचे नियम तोडले आहे.कोरोना माझे काही करू शकत नाही.कारण मी गाढव आहे.या मजकुरासह गाढवाचा फोटो असलेले फ्लॅक्स कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्यावतीने गावातील प्रत्येक चौकात लावण्यात आलेले आहेत.संचारबंदीचे नियम मोडून विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना याठिकाणी थांबवून त्यांचा गाढवाच्या फ्लॅक्स जवळ फोटो काढून सोशल मीडियावर प्रसिद्ध केला जात आहे.या आगळ्यावेगळ्या कारवाई मुळे विनाकारण बाहेर फिरणाऱ्या युवकांना आळा बसायला लागला आहे.तर पुणे ग्रामीण पोलीस दलातील स्पेशल कमांडोची तुकडी ही लोणी काळभोर परिसरात दाखल झाल्याने कदमवाकवस्ती ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने आता परिसरात संचारबंदी करीता आपली कंबर कसलेली आहे असे दिसून येत आहे.कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या रोज वाढत आहे. जिल्ह्यात आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. खबरदारीची उपाय म्हणून हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचा परिसर काल शुक्रवारी मध्यरात्री बारा वाजल्यापासून पुढील आदेश येईपर्यंत सील करण्यात येत असल्याचा उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी एका पत्राद्वारे आदेश काढला त्यानुसार ग्रामपंचायत व लोणी काळभोर पोलीस प्रशासन यांनी एक बैठक घेऊन चर्चा करून त्यानुसार अंमलबजावणी सुरू केलेली आहे. ही गावं केंद्र बिंदू मानून तीन किलोमीटरचा परिसर बफर झोन (प्रतिबंधित क्षेत्र) करण्यात आला आहे. तसेच अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर जाणाऱ्यांनी प्रत्येकांनी तोंडाला मास्क लावणे बंधनकारक केले आहे.

टॅग्स :PuneपुणेLoni Kalbhorलोणी काळभोरPoliceपोलिसgram panchayatग्राम पंचायतcorona virusकोरोना वायरस बातम्या