शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैवी! चाऱ्याअभावी भुकेने तडफडत 'भोलेनाथा'ने घेतला जगाचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 11:57 IST

लॉकडाऊनमुळे नंदीवाल्यांना बसतोय फटका

ठळक मुद्देलॉकडाऊनमचारापाणी मिळत नाही, गावोगावी फिरून लहान थोरांची करमणूक करणाऱ्या नंदीला वाचवणार कसे

पिंपरी: नंदीबैल घेऊन गावोगावी फिरून मोडकेतोडके भविष्य सांगून भोळ्याभाबड्या लहान थोरांची करमणूक करण्याचे काम करत असतो. नागरिकांकडून या नंदीच्या पोटापाण्याची सोय होते. परंतु लॉकडाऊनमुळे अनेक नंदीवाल्याना फटका बसला आहे. "आम्ही आमचे पोट भरू पण मुक्या जनावरांसाठी चारा कुठून आणणार" अशी भावना नंदीवाल्यानी व्यक्त केली आहे. अशाच परिस्थितीत एका नंदीने चारापाणी न मिळाल्याने भुकेअभावी जगाचा निरोप घेतला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील वाल्हेकरवाडी येथे आज सकाळी ही दुर्दैवी घटना घडली.

वाल्हेकरवाडी येथे पवना नदीच्या घाट परिसरात नंदीवाल्यांचे २५ कुटुंब वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे नंदीबैल तसेच इतर जनावरेही आहेत. सहा नंदी असून एका कुटुंबातील एक सदस्य, असे पाच ते सहा सदस्य मिळून एक नंदी घेऊन शहर परिसरात फिरून उदरनिर्वाह चालवतात. मात्र लॉकडाऊनमुळे त्यांच्या फिरण्यावर निर्बंध आले. त्यांच्याकडे उपलब्ध होता तेवढा चारा त्यांनी नंदीबैल तसेच इतर जनावरांना दिला. मात्र दोन-चार दिवसांतच चारा संपला. हातात पैसा नसल्याने तसेच बाहेर पडता येत नसल्याने चारा खरेदी करण्यास किंवा उपलब्ध होण्यात अडचणी आल्या. घाट परिसरात नदीकिनारी जनावरांना चरायला सोडले. मात्र तेथेही गवत किंवा चारा उपलब्ध नसल्याने जनावरांची उपासमार होऊ लागली. त्यातच सहा वर्षे वयाचा नंदी चाऱ्याअभावी भुकेने व्याकुळ झाला. नंदीवाल्यांनी त्याचा जीव वाचावा म्हणून अतोनात प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. चारा उपलब्ध होऊ शकला नाही. परिणामी भुकेने तडफडत त्या नंदीने जगाचा निरोप घेतला. 

सांग सांग भोलानाथ लॉकडाऊन खुलेल काय?भगवान महादेवाचे वरदान लाभलेला बैल म्हणून नंदीला विशेष महत्त्व असते. नंदीवाले मोडके तोडके भविष्य सांगतात. त्यावर हा नंदी दोन-तीन वेळा मान हलवून शिक्कामोर्तब करतो. सुगीच्या दिवसांमध्ये हे नंदीवाले ग्रामीण भागात फिरून धान्य तसेच पैसे जमा करून आणतात. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह होतो. सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय हे बालगीत देखील या नंदीवर आधारित आहे. मात्र कोरोना महामारीमुळे नंदीचे हाल आहेत. सांग सांग भोलानाथ लॉकडाऊन खुलेल काय, असा प्रश्न पडतो आहे.

गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये एका नंदीसह चार जनावरे दगावली. आज आणखी एक नंदी दगावला. आमचे पोट आम्ही कसेबसे भरू. मात्र या मुक्या जनावरांचे काय, त्यांच्यासाठी चारा कोठून आणणार, त्यांचा जीव कसा वाचवायचा असं प्रश्न आम्हाला पडतो आहे.                                                                                                  - सदाशिव गंगावणे, नंदीवाले, वाल्हेकरवाडी

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचारcorona virusकोरोना वायरस बातम्या