शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैवी! भोर तालुक्यात पावसाचा हाहाकार, वीज पडून दोन मुलींचा मृत्यू, तर एक मुलगी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2021 20:21 IST

घराशेजारील डोंगरालगत खेळत असताना घडला हा प्रकार

ठळक मुद्देआदिवासी कातकरी कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

नसरापूर: भोर तालुक्यातील नसरापूर येथे दुपारी झालेल्या वादळी पावसात वीज पडून दोन लहानग्या मुलींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यावेळी अजून एक मुलगी यातून सुदैवाने वाचली आहे. या घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे या आदिवासी कातकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

आज दुपारी साडे तीनच्या दरम्यान घरा शेजारील डोंगरालगत मोठ्या खडकापाशी तीन मुली खेळत असताना ही घटना घडली आहे. त्यामध्ये सीमा अरुण हिलम(वय ११) व अनिता सिंकदर मोरे (वय ९, दोघी रा.चेलाडी, नसरापूर) या दोन लहान मुलींचा मृत्यू झाला. तर यातून चांदणी प्रकाश जाधव (वय ९ ) ही मुलगी यातून सुदैवाने बचावली आहे.

डोंगरालगत खेळत असताना अचानक आलेल्या पावसात विजेचा कडकडाट झाला. यामध्ये तीन मुलींपैकी दोन मुली घटना स्थळी वीज पडल्याने भाजून निघाल्या तर एक मुलगी बेशुद्ध झाली होती. यातूनही त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी तातडीने वेळ न घालवता नसरापूर येथील सिद्धीविनायक रुग्णालयात उपचारासाठी तिन्ही मुलींना दाखल केले होते. दरम्यान यापैकी सीमा व अनिता या दोन मुली उपचारापूर्वीच मृत झाल्याचे डॉ.जगदीश फराटे यांनी सांगितले.

यावेळी मंडलाधिकारी श्रीनिवास कंडेपल्ली, तलाठी जालिंदर बरकडे, पोलीस निरीक्षक विलास देशपांडे, सहायक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसारे, उपनिरीक्षक राहुल साबळे व प्रमोद भोसले यांनी या दुर्दैवी घटनेची पाहणी करून पंचनामा केला. मृत झालेल्या मुलीच्या कुटुंबांना तातडीने शासकीय आर्थिक मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.  

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसbhor-acभोर