शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

पतीच्या डोळ्यासमोर महिलेचा दुर्दैवी मृत्यू; बिबट्याने ऊसाच्या शेतात नेऊन केली शिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 12:44 IST

22 वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची खळबळजनक घटना...

टाकळी हाजी (पुणे) : पिंपरखेड (ता. शिरूर) येथील बोंबेमळा (कुऱ्हाडे वस्ती) परिसरात बुधवार (दि. 1) रोजी रात्री साडे आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास रस्त्यांने जाणाऱ्या पुजा जालिंदर जाधव या 22 वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची खळबळजनक घटना घडल्याने शेतकरी वर्गात मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या महिलेवर बिबट्याने हल्ला करीत येथून जवळच्या उसाच्या शेतात ओढत नेऊन तिच्या गळ्याभोवतीचा काही भाग खाल्ल्याने सदर महिला मयत झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. घोड कुकडी नदीच्या  बेट भागात बिबट्याने मानवावर हल्ला करून ठार मारण्याची ही चौथी घटना असून बिबट्याच्या हल्ल्यात यापूर्वी अनेक नागरीक जखमी झाले. त्यामुळे येथील शेतकऱ्यांसह, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ही महिला ही पुणे जिल्ह्यातील टाकेवाडी, कळंब (ता. आंबेगाव) येथील रहिवासी असून तिचे पती जालिंदर मारुती जाधव (वय 26) व दिर विश्वास बाळू जाधव (वय 38) असे तिघे मोटरसायकलवर फाकटे ते कळंब गावी जात असताना बोंबे मळा परिसरात लघुशंके करिता थांबले असता या महिलेचा पती व दिराच्या डोळ्या देखत महिलेवर बिबट्याने हल्ला करीत उसाच्या शेतात ओढत नेले. त्यानंतर दोघांनी आरडाओरडा झाल्यानंतर जमा झालेल्या नागरिकांनी शोध घेतला असता उसाच्या शेतात पुजाचा मृतदेह मिळून आला.

या घटनेमुळे परिसरात मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ऊस शेती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्या शेताच्या बाजुनेच रस्ते जात असून रस्त्याने मजुर शाळकरी मुले ये-जा करीत असतात. यापूर्वी जांबूत येथे तीन घटना घडल्या असून ही चौथी घटना माणसावर हल्ला करण्याची घडली आहे. या परिसरात बिबट्याचे हल्ले वाढत चालले असून कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी सरपंच राजेंद्र दाभाडे यांनी केली आहे. घटनास्थळी वन परीक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, सुनिल उगले यांनी भेट दिली.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडleopardबिबट्या