शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

परराज्यातील बेकायदा मद्य जप्त; उत्पादन शुल्क विभागाची घोरपडीत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 12:00 IST

हरियाणा आणि गोव्यामधून आणलेले साडेतीन लाख रुपयांच्या विदेशी मद्याच्या बाटल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केल्या. घोरपडी गाव आणि दापोडीमध्ये छापे टाकून ही कारवाई करण्यात आली. 

ठळक मुद्देसैन्यासाठी राखीव असलेले हे मद्य बेकायदेशीरपणाने आणण्यात आले होते पुण्यातहरियाणा राज्य बनावटीच्या १२२ बाटल्या तर गोव्यातील १३७ बाटल्या करण्यात आल्या जप्त

पुणे : हरियाणा आणि गोव्यामधून आणलेले साडेतीन लाख रुपयांच्या विदेशी मद्याच्या बाटल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केल्या. सैन्यासाठी राखीव असलेले हे मद्य बेकायदेशीरपणाने पुण्यामध्ये आणण्यात आले होते. घोरपडी गाव आणि दापोडीमध्ये छापे टाकून ही कारवाई करण्यात आली. विभागाच्या भरारी पथक क्रमांक दोनच्या अधिकाऱ्यांना घोरपडी गाव आणि दापोडीमध्ये बेकायदा मद्य आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, घोरपडी गावातील भारत फोर्ज कंपनीजवळ राहणाऱ्या मणिकंदन नायर याच्या घरावर छापा टाकण्यात आला. त्याच्या घरामध्ये हरियाणा व गोव्यामधून आणलेली २ लाख १३ हजारांचे मद्य मिळून आले. नायरकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दापोडी येथील काटे वस्तीमधील शंभूराजे चिकन अँड एग्ज सेंटरवर छापा टाकण्यात आला. या दुकानामध्ये १ लाख ४४ हजारांचे मद्य मिळून आले. हरियाणा राज्य बनावटीच्या १२२ बाटल्या तर गोव्यातील १३७ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, अधीक्षक मोहन वर्दे, उपअधीक्षक सुनील फुलपगार आणि प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक वसंत कौसडीकर, उपनिरीक्षक राजेंद्र झोळ, कैलास वाळुंजकर, महेश बनसोडे, सुनील कुदळे, केशव वामने यांनी ही कामगिरी केली.

टॅग्स :PuneपुणेHaryanaहरयाणाgoaगोवा