शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
4
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
5
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
6
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
7
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
8
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
9
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
10
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
11
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
12
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
13
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
14
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
15
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
16
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
17
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
18
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
19
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
20
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

बेशिस्त पोलिसांना होणार का दंड?

By admin | Updated: August 28, 2015 04:24 IST

वेळ दुपारी १२.४५ची. पिंपरीच्या नेहमीप्रमाणे गजबजलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील सिग्नलला खुद्द पोलीसच दुचाकीवर ट्रिपल सीट. समोरच कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांकडून मात्र दुर्लक्ष.

- हणमंत पाटील,  पिंपरीवेळ दुपारी १२.४५ची. पिंपरीच्या नेहमीप्रमाणे गजबजलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील सिग्नलला खुद्द पोलीसच दुचाकीवर ट्रिपल सीट. समोरच कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांकडून मात्र दुर्लक्ष. बेशिस्त चालकांना सीसीटीव्हीत पाहून घरपोच पावती देणारे वाहतूक पोलीस नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या बेशिस्त पोलिसांवर कारवाई करणार का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. राज्य शासनाच्या निधीतून शहरातील विविध चौकांत सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. महिनाभरात वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन केलेल्या २८८ चालकांना घरपोच नोटीस पाठविण्यात आली. त्यांच्याकडून हजारो रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. यामध्ये सर्वाधिक कारवाई नेहमी रहदारी असलेल्या डॉ. आंबेडकर चौकात करण्यात येते. त्यामुळे वाहतूक पोलीस या चौकात रोज ठाण मांडून असतात. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि बेशिस्त वाहनचालकांवर येथे हमखास कारवाई करण्यात येते. याच चौकात गुरुवारी ‘लोकमत’ प्रतिनिधीने नियमांचे उल्लंघन करीत एका दुचाकीवर बसलेल्या तीन पोलिसांचे छायाचित्र टिपले. या दुचाकीचा नंबर होता एमएच १६ एक्यू ४६९५. पादचाऱ्यांना महामार्ग ओलांडण्यासाठी असलेल्या झेब्रा क्रॉसिंगवर बेशिस्तपणे संबंधित पोलीस दुचाकीवर ट्रिपल सीट सिग्नलला थांबले होते. त्याच वेळी झेब्रा क्रॉसिंगच्या मागे उभे राहून नियम पाळणाऱ्या दुचाकीचालकांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीजवळ तीव्र नाराजी व्यक्त केली. वाहतुकीचे नियम व दंड केवळ सामान्यांनाच आहे. नियमांचे उल्लंघन करून बेशिस्त वाहतूक करणाऱ्या या पोलिसांवर कारवाई होणार का, संबंधित पोलिसाला घरपोच नोटीस दिली जाणार का, असे सवाल त्यांनी उपस्थित केले.