शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

अस्वच्छ हॉटेलची माहिती लोकहितविरोधी! : एफडीए; व्यापक लोकहीत नसल्याचे सांगितले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 18:05 IST

अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) कोणत्या हॉटेल्सवर अस्वच्छतेच्या कारणांवरुन कारवाई केली याची माहिती देण्यास नकार दिला आहे.

ठळक मुद्देकिती दंड ठोठावला, तपासणी अहवालाची प्रत याची माहिती देण्यास एफडीएचा नकारमाहिती आयुक्तांकडे तक्रार करणार : अजहर खान

पुणे : अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) कोणत्या हॉटेल्सवर अस्वच्छतेच्या कारणांवरुन कारवाई केली याची माहिती देण्यास नकार दिला आहे. व्यापक लोकहिताच्या दृष्टीने ही माहिती देता येणार नसल्याचे उत्तर एफडीएने दिले आहे. शहरातील किती हॉटेल्स, केटरर्सची माहिती एफडीएकडून मागविण्यात आली होती. यातील किती आस्थापनांची आरोग्य व स्वच्छतेबाबत तपासणी केली. कारवाईतील दोषी हॉटेल्सवर कोणती कारवाई केली, त्यांची नावे आणि दंडाची रक्कम याची माहिती मागविण्यात आली होती. त्याला उत्तर देताना एफडीऐने शहरात २ हजार २४८ हॉटेल्स व केटरर्सना परवाने दिले असल्याचे सांगितले. मात्र कोणत्या हॉटेल्सवर कारवाई झाली, त्यांना किती दंड ठोठावला, तपासणी अहवालाची प्रत याची माहिती देण्यास नकार दिला. कारवाई केलेल्या हॉटेल्सची माहिती दिल्यास संबंधित आस्थापनांच्या स्पर्धात्मक स्थानाला तपासणी अहवालातील मुद्द्यांमुळे हानी पोहोचू शकते. तसेच तपासणी अहवालातील काही मुद्द्यांवर न्यायालयात खटले सुद्धा दाखल झाले आहेत. त्यामुळेच व्यापक लोकहिताच्या दृष्टीने अशी माहिती आवश्यक असल्याचे दिसून येत नसल्याने ही माहिती नाकारण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण एफडीएच्या पुणे विभागाच्या सह आयुक्तांनी माहिती अधिकारात दिले आहे. हॉटेलांच्या तपासणीची माहिती एफडीए कार्यालयाने स्वत:हून जाहीर केली पाहीजे. हॉटेल्स अथवा केटरर्स अस्वच्छ आणि रोगराई पसरविणाऱ्या वातावरणात खाद्यपदार्थ करत असतील, तर त्यांची माहिती उघड करायला हरकत घेण्याची गरज नाही. उलट माहिती जाहीर करणे व्यापक लोकहीताचेच आहे. माहिती नाकारण्यासाठी वापरलेली ही युक्ती आहे. त्या विरोधात माहिती आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे लोकहित फाउंडेशनचे अध्यक्ष अजहर खान यांनी सांगितले. 

टॅग्स :hotelहॉटेलPuneपुणे