शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामे हटविली, सार्वजनिक बांधकाम विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 00:25 IST

पवनानगर : सार्वजनिक बांधकाम विभागाची बाजारपेठेत कारवाई

पवनानगर : पवनानगर बाजारपेठेतील अनधिकृत बांधकामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हटवण्यात आली आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता राकेश सोनवणे यांनी दिली.

पवनानगर बाजारपेठ या परिसरातील ४० गावे व वाड्यावस्त्यांसाठी सर्वांत मोठी बाजारपेठ समजली जाते. त्यामुळे बाजारपेठेत दररोज वर्दळ असते. त्यातच या परिसरामध्ये पवना धरण, तुंग, लोहगड, विसापूर, तिकोणा हे ऐतिहासिक किल्ले, प्रतिपंढरपूर, लेणी अशी अनेक पर्यटनस्थळे आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची वर्दळ पाहण्यास मिळते. त्यामुळे चौकात नेहमी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यातच पवनानगर बाजारपेठेतील अनेक व्यापाऱ्यांनी आपल्याला दिलेल्या जागा सोडून रस्त्यापर्यंत अतिक्रमणे केली आहेत. त्यामुळे रस्ता अरूंद झाला आहे.अनेकदा वादाचे प्रकार घडत असतात. अनेक प्रकारे पोलिसांच्या मदतीने साडोविले जातात. वाहनचालकांना कुणी समजुन सांगण्यास गेल्यास अरेरावीचा भाषा वापरली जाते.त्यामुळे अनेकदा सार्वजनिक विभागाकडे तक्रारी झाल्या आहेत. त्यानंतर विभागाकडून संबधित अतिक्रमण करणाºयांना यापूर्वी नोटिसा देण्यात आला होत्या. त्यामुळे आज पवनानगर चौकातील रस्त्यावर आलेली अतिक्रमणे जेसीबीच्या साह्याने पाडली आहेत. त्यामुळे ज्या व्यापाºयांनी व नागरिकांनी अतिक्रमणे केली आहेत. त्यांनी स्वत:हुन अतिक्रमणे काढून घ्यावीत, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले होते. लोणावळा ग्रामीणचे निरिक्षक रामदास इंगवले, पोलीस नाईक एस. एम. शेख एस.पी गवारे, होमगार्ड एस. बी. घारे उपस्थित होते.

टॅग्स :Puneपुणे