शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामांना पुणे महापालिकेचेही संरक्षण; ७० हजारांपेक्षा अधिक बांधकामे करणार नियमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 12:28 IST

शहरातील अनधिकृत बांधकामांना नियमित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. राज्य सरकारने सन २०१५ पूर्वीच्या बांधकामांना संरक्षण दिले असून, त्या अनुषंगाने महापालिकेने ही तजवीज केली आहे.

ठळक मुद्दे महापालिकेला अंदाजे २०० कोटी रुपयांचे उत्पन्न दंडापोटी अपेक्षितआलेल्या अर्जांमधील बांधकामांची प्रत्यक्ष पाहणी करुनच केली जातील अधिकृत : प्रशांत वाघमारे

पुणे : शहरातील अनधिकृत बांधकामांना नियमित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. राज्य सरकारने सन २०१५ पूर्वीच्या बांधकामांना संरक्षण दिले असून, त्या अनुषंगाने महापालिकेने ही तजवीज केली आहे. शहरातील सुमारे ७० हजार बांधकामांना याचा फायदा होणार असून त्यातून महापालिकेला अंदाजे २०० कोटी रुपयांचे उत्पन्न दंडापोटी अपेक्षित आहे. बांधकाम मालकांनी ६ महिन्यांच्या आत महापालिकेकडे त्यांच्या बांधकामाच्या माहितीविषयी आॅनलाईन अर्ज करायचा आहे. हा अर्ज वास्तुविशारदाच्या माध्यमातूनच करणे सक्तीचे आहे. त्यानंतर महापालिकेच्या अभियंता पथकाकडून या बांधकामाची पाहणी केली जाईल. महापालिकेने निश्चित केलेल्या नियमावलीमध्ये हे बांधकाम असेल तर त्याला दंड आकारून ते नियमित केले जाईल. महापालिकेत नुकत्याच समाविष्ट झालेल्या ११ गावांमधील अशा बांधकामांनाही याचा फायदा दिला जाणार आहे. महापौर मुक्ता टिळक व शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. राज्य सरकारने सन २०१५ पूर्वीच्या अनधिकृत बांधकामांना संरक्षण दिले आहे. त्याच अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या सोमवारपासून सहा महिन्यांपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. त्यानंतर अर्ज न करण्यात आलेली सर्व अनधिकृत बांधकामे पाडून टाकली जातील असे वाघमारे यांनी सांगितले.काही वर्षांपूर्वी सरकारने महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील बांधकामे नियमित करण्यासाठी गुंठेवारी कायदा लागू केला होता. त्यात सरसकट सर्वच बांधकामे नियमित करण्यात आली होती. या वेळी मात्र अटी, शर्ती ठेवण्यात आल्या आहेत. महापालिकेत नुकत्यात आलेल्या ११ गावांना या अटीशर्ती लागू केल्या तर तेथील बांधकामांची अडचण होणार आहे. शहरात सुमारे ७० हजार बांधकामे अनियमित स्वरूपाची किंवा विनापरवाना केलेली अशी आहेत. त्यांच्यासाठी मात्र हा फायद्याचा निर्णय आहे.  अटी, शर्ती लागू केल्या असल्या तरीही त्यांच्यातील अनेक जण पळवाट काढत बांधकाम कायदेशीर करून घेण्याची शक्यता आहे.

नियम व अटी लागूसर्वच अनधिकृत बांधकामे नियमित होतील असे नाही. त्यासाठी महापालिकेने काही अटी व शर्ती घातल्या आहेत. त्याचे तपशील महापालिकेने जाहीर केले आहेत. महापालिकेने आरक्षित केलेल्या, सरकारच्या मालकीच्या असलेल्या, अतिक्रमण असलेल्या जागांवरील बांधकामे अधिकृत होणार नाहीत. बांधकाम कसे आहे, किती आहे, कोणत्या रस्त्यावर आहे, त्याचा वाहतूक किंवा अन्य कोणाला त्रास होतो आहे का, असे अनेक निकष लावून त्यानंतरच अशी बांधकामे अधिकृत केली जातील. नदी, कॅनॉल यांना अडथळा, त्यांना आकारण्यात येणारा दंड जमिनीच्या किमतीच्या १० टक्के असा असणार आहे. फक्त दंडच नाही तर बांधकाम विकसन शुल्कही आकारण्यात येणार असून, ते नेहमीपेक्षा दुप्पट असणार आहे.

आलेल्या अर्जांमधील बांधकामांची प्रत्यक्ष पाहणी केली जाऊन नंतरच ती अधिकृत केली जातील. त्यासाठी ११ अभियंत्यांचे एक पथक स्थापन करण्यात आले आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर साधारण महिनाभरात पाहणी होऊन त्यांना बांधकाम नियमित असल्याचे प्रमाणपत्र दिले जाईल. सहा महिने पूर्ण झाल्यानंतर मात्र शहरात एकही अनधिकृत बांधकाम राहू देणार नाही, सर्वांवर कारवाई केली जाईल.- प्रशांत वाघमारे, शहर अभियंता

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPuneपुणे