शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

उजनीच्या पाण्यात दीड महिन्यात १२ टक्क्यांनी घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 01:33 IST

संपूर्ण महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचे मोठे असलेल्या उजनी धरणाचा पाणीसाठा दीड महिन्यात जवळपास १२ टक्क्यांनी कमी झाला आहे.

पळसदेव : संपूर्ण महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचे मोठे असलेल्या उजनी धरणाचा पाणीसाठा दीड महिन्यात जवळपास १२ टक्क्यांनी कमी झाला आहे. ३ आॅगस्ट रोजी उजनी धरणात १०६ टक्के पाणीसाठा होता; मात्र आजमितीला धरणात ९४.०९ टक्के पाणीसाठा असल्याची माहिती उजनी धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली. दीड महिन्यात १२ टक्के पाणी कमी झाल्यामुळे आगामी काळात काय परिस्थिती ओढवेल, याचा प्रत्यय आत्ताच येऊ लागला आहे.उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकºयांवर अन्याय होत आहे. याबाबत इंदापूर तालुक्यातील शेतकºयांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. उजनी धरणासाठी आम्ही जमिनी दिल्या; मात्र आमचा कोणीही विचार करीत नाही. पुढील वर्षी उजनी भरण्यास सप्टेंबर महिना उजाडणार आहे. आताच ही परिस्थिती निर्माण झाल्यास आम्ही शेती करायची कशी? असा प्रश्न इंदापूर तालुक्यातील शेतकरी विचारत आहेत. आमच्या हक्काचे पाणी ‘आरक्षित’ ठेवून सोलापूर जिल्ह्याला पाणी द्या; मात्र आमच्या हक्काच्या पाण्याला धक्का लागल्यास आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा इंदापूर तालुक्यातील ‘उजनी’ लगतच्या शेतकºयांनी दिला आहे.>उजनी धरण बचाव कृती समितीचे अध्यक्ष अरविंद जगताप यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की उजनी धरणासाठी जमिनी देऊन इंदापूर तालुक्यातील शेतकरी भूमिहीन झाला आहे. त्यामुळे येथील शेतकºयांवर अन्याय होता कामा नये. पाण्याचे वाटप होताना समन्यायी वाटप होणे गरजेचे आहे. आमच्यावर अन्याय झाल्यास आम्ही आत्मदहन करू, असा इशारा देऊन सध्या उजनी धरणातून जेऊर ते परंडा बोगद्याचे काम सुरू आहे; मात्र त्याची खोली वस्तुस्थितीला धरून नाही. कॅनॉलपेक्षा बेड लेवलपेक्षा दोन मीटर खोल असल्याची माहिती जगताप यांनी दिली. त्यामुळे उजनी धरण व्यवस्थापन समान न्याय अशी मागणी होत आहे.