शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

उजनीत १४.९६ टीएमसी गाळ

By admin | Updated: February 3, 2016 01:18 IST

गेल्या ३४ वर्षांपासून उजनी धरणात १४.९६ टीएमसी गाळ साठला आहे. तो काढला गेल्यास तेवढ्याच प्रमाणात धरणाची पाणी साठवण क्षमता वाढणार आहे.

इंदापूर : गेल्या ३४ वर्षांपासून उजनी धरणात १४.९६ टीएमसी गाळ साठला आहे. तो काढला गेल्यास तेवढ्याच प्रमाणात धरणाची पाणी साठवण क्षमता वाढणार आहे. त्या पाण्याचा उपयोग धरणाच्या मूळ सिंचन आराखड्यात असणाऱ्या; मात्र गेली दहा ते बारा वर्षे सिंचनापासून वंचित असणाऱ्या मंगळवेढा, दक्षिण सोलापूरच्या टप्प्यातील १९ हजार हेक्टर कोरडवाहू क्षेत्रास होणार आहे. तथापि, गाळ काढण्यास धरणक्षेत्रातील शेतकरी व मच्छीमारांचा विरोध आहे. त्यामुळे सन २०११-१२ च्या सुमारास गाळ काढण्याच्या प्रक्रियेस मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मात्र, आजच्या घडीला गाळामुळे धरणाच्या पाणी साठवण क्षमतेवर परिणाम होत आहे. प्रतिकूल परिणाम टाळण्याकरिता, गाळ काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखणे अपरिहार्य आहे,अशी वस्तुस्थिती आहे. उजनी धरणाची मुळची पाणी साठवण क्षमता ११७ टीएमसी आहे. सन १९७७ ला पहिल्यांदा धरणात पाणी अडविण्यात आले. सन १९८० मध्ये पूर्ण क्षमतेने पाणी अडविण्यात आले होते. मागील ३४ वर्षांत धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साठला आहे. शासनाच्या ‘मेरी’ या नाशिक येथील संस्थेने सन २००२ मधे धरणातील गाळाचा अभ्यास केला. त्या काळात त्या संस्थेच्या अहवालानुसार धरणात ८.५८ टीएमसी गाळ साठल्याचे निदर्शनास आले होते. याच संस्थेने सन २००७ मध्ये पुन्हा गाळाचे सर्वेक्षण केले. त्या वेळी गाळाचे प्रमाण ८.४० टीएमसी होते. नोव्हेंबर २०११ मध्ये नवी दिल्ली येथील केंद्रीय जल आयोगाने ‘टुजो विकास’ या संस्थेच्या माध्यमातून,जीपीएस पद्धतीने गाळाचे फेरसर्वेक्षण केले. त्याचा अंतिम अहवाल मार्च २०१२ ला शासनास सादर केला, त्या वेळी धरणात १४.९६ टीएमसी गाळ साठला असल्याचे स्पष्ट झाले. यापैकी ४ टीएमसी गाळ हा धरणातील उपयुक्त साठ्यात, तर ११.९६ टीएमसी गाळ मृत साठ्यात असल्याचे ही निष्पन्न झाले. साठलेल्या गाळाचा धरणांमधून कालवा व बोगद्याद्वारे सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. गाळामुळे साठवणुकीत घट झाली आहे. प्रकल्पिय तरतुदी नुसार गृहीत धरलेले सिंचन होत नाही, अशी वस्तुस्थिती आहे.उजनी धरणाची पाणी साठवण क्षमता पूर्ववत करण्यासाठी गाळ काढणे अपरिहार्य आहे. धरणाचा पसारा व विस्तार पाहता, हे काम सोपे नाही. स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध, बऱ्याच ठिकाणचा रस्त्यांचा अभाव आहे. जलवाहिनींचे जाळे, गाळ काढण्याऐवजी आत्ता काळ्या सोन्याचे मोल आलेली जलसाठ्यात खोलवर दडलेली वाळू उपसण्याकडेच असणारा कल, गाळ कोठे टाकायचा, हा उभा ठाकलेला प्रश्न ही सारी आव्हाने समोर आहेत. गाळ काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा लागणार आहे. उजव्या व डाव्या तीरावर सहा ते सात ठिकाणी टप्पे करावे लागणार आहेत. गाळपेर क्षेत्र कसणाऱ्या शेतकऱ्यांचा विरोध मोडीत काढण्यासाठी उपाय करावे लागणार आहेत. उजनी धरणास स्वत:चे असे हक्काचे पाणलोट क्षेत्र नाही. त्या बाबतीत उजनी परावलंबी धरण आहे. दौंड ते उजनीपर्यंतच्या भागात अत्यल्प पाऊस पडतो. मावळ व भीमाशंकर खोऱ्यात समाधानकारक पाऊस झाला तरच उजनी भरते, अशी परिस्थिती आहे.