शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चे मुख्यमंत्री होते, त्यांच्याकडे आता फक्त मातोश्रीच राहील"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 09:02 IST

डॉ. सावंत यांच्या दाव्याबद्दल माहिती नाही narayan rane on uddhav thackeray, shiv sena, matoshri, pune latest news, pune political news

पुणे :उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नाही, त्यांच्याबद्दल मला काहीही विचारू नका. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कधीही नव्हते, फक्त ‘मातोश्री’चे मुख्यमंत्री होते. आता त्यांच्याकडे फक्त मातोश्रीच राहील’, अशा शब्दांमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. ‘आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केलेल्या मी दीडशे बैठका घेतल्या या दाव्याबाबत मला काहीच माहिती नाही’, असे ते म्हणाले.

भारतीय जनता पक्षाचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी पुण्यात आलेल्या राणे यांनी नंतर पत्रकारांबरोबर संवाद साधला. ठाकरे यांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये पोस्टर लावण्याबाबत विचारले असता त्यांनी, ‘ठाकरेंचे मला काहीही विचारू नका’, असे उत्तर दिले. ‘ते म्हणजे महाराष्ट्र नाही, दुसरे विषय बरेच आहेत’, असे ते म्हणाले.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर गेल्यापासून ते आताचे भाजप-शिवसेना युतीचे सरकार बनेपर्यंत आपण स्वत: दीडशे गुप्त बैठका घेतल्या, या आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या वक्तव्याबाबत राणे म्हणाले, ‘ते काय म्हणाले हे मला माहिती नाही. ते महाराष्ट्रात मुंबईत असतात व मी दिल्लीत असतो. अशा विषयांवर ते माझ्याबरोबर कधी बोलत नाही. त्यामुळे याबाबत काहीच सांगता येणार नाही’, असे ते म्हणाले.

महाराष्ट्रात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे अशा दोन यात्रा निघणार आहेत. राज्यातील एकूण वातावरण लक्षात घेता तुम्ही याबाबत दोघांनाही काय सल्ला द्याल? यावर राणे यांनी ‘ऐकणाऱ्यांना सांगेन, न ऐकणाऱ्यांना सांगू शकत नाही. त्यांना यात्रा काढायचीच आहे. सावरकरांबद्दल न असलेले प्रेम त्यांना दाखवायचेच आहे. ऐकणारे आमच्या पक्षाचे आहेत. त्यांना सांगेन.’

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना