पुणे : वारजे येथे पार्क केलेली दोन मोटारसायकली व रिक्षा पेटवून देण्याची घटना पहाटे उघडकीस आली़ याप्रकरणी प्रवीण चौधर (वय २६, रा़ वारजे) यांनी फिर्याद दिली आहे़ रामनगरमधील जय भवानी चौकातील पाण्याच्या टाकीजवळ रविवारी सायंकाळी दोन मोटारसायकली व रिक्षा पार्क करून ठेवण्यात आल्या होत्या़ पहाटे तीनच्या सुमारास कोणीतरी त्यावर पेट्रोल टाकून ही तिन्ही वाहने पेटवून दिली़ त्यात त्यांचे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे़ (प्रतिनिधी)
वारज्यात वाहने पेटविण्याचा प्रकार
By admin | Updated: November 15, 2016 03:50 IST