पुणे : भरतीप्रक्रियेत तोतया उमेदवार उभा करून फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे. लेखी परीक्षेसाठीच्या अर्जातील फोटो आणि शारीरिक चाचणीच्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये असलेली व्यक्ती वेगळी असल्याचे आढळल्याने हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन बाबू पवार ( वय २७, रा. ओतूर, ता.जुन्नर) आणि दीपक पानसरे (वय २५, रा. डिंगोरे, ता.जुन्नर) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत.याप्रकरणी पोलीस निरीक्षक वैजनाथ चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. उमेदवारांचे व्हिडिओ शूटिंग चेक करत असताना लखी परीक्षा एकाने तर शारीरिक परीक्षा दुसऱ्याने दिल्याचे आढळून आले. दुसऱ्या प्रकरणात दीपक पानसरेच्या हजेरी पटावरील फोटो, ओळखपत्र रजिस्टर व लेखी परीक्षेसाठी आॅनलाईन सादर केलेल्या अर्जातील फोटो वेगळे असल्याचे दिसले.
भरतीप्रक्रियेत तोतया उमेदवाराकडून फसवणुकीचा प्रकार
By admin | Updated: April 28, 2017 06:07 IST