रांजणगाव गणपती : रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने दुचाकी चोरणा-या टोळीचा पदार्फाश केला असून एकूण ७ आरोपींना अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीसांच्या रेकॉर्ड वरील आरोपीवर पोलीस पथकाने करडी नजर ठेऊन संभाजी बजरंग नायकोडी (रा.कवठेयमाई, ता.शिरुर) यासं दुचाकी चोरी प्रकरणी ताब्यात घेतले. त्यांला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने पंकज दिलीप मावळे (रा.मलठण, ता.शिरुर) याच्या मदतीने दुचाकी चोरल्याचे कबूल केले. या दोन्ही आरोपींना अटक करुन अधिक चौकशी केली असता दुचाकी चोरी करणा-या आणखी ५ आरोपींना विविध ठिकाणाहून अटक केली असून त्यांनी आतापर्यंत रांजणगाव गणपती, मुरबाड, सुपा, शिक्रापूर, चंदननगर, पुणे येथून एकूण २२ दुचाकी चोरल्याची कबूली दिली आहे. त्या सर्व दुचाकी पोलीसांनी हस्तगत केल्या आहेत. या प्रकरणी संभाजी बजरंग नायकोडी (रा.कवठेयमाई), पंकज दिलीप मावळे (रा.लाखेवाडी, मलठण), प्रफुल्ल पोपट खटाटे (रा.टाकळी हाजी), अक्षय पे्रमचंद देवडे (रा.शिक्रापूर), अमित सुनिल टिंगरे (रा.टाकळी हाजी ता.शिरुर), सुभाष प्रकाश वाळके (रा.चांबुर्डी, ता.श्रीगोंदा), पाराजी सुरेश जासूद (रा.दहिटणे गुंजाळ, ता.पारनेर) अशा एकूण ७ आरोपींना अटक केली आहे. त्यांना शिरुर न्यायालयात हजर केले असता शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या दुचाकी चोरांचा छडा लावण्यासाठी मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.निरीक्षक प्रफुल्ल कदम, उपनिरीक्षक अमोल गोरे, शुभांगी कुटे, पोलीस नाईक अजित भुजबळ, विनायक मोहिते, प्रफुल्ल भगत, पोलीस मंगेश धिगळे, राजेंद्र वाघमोडे, होमगार्ड किरण दाते, दिपक दंडवते यांनी मोलाची कामगिरी बजावली.
रांजणगावला दुचाकी चोरांची टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 22:10 IST
रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने दुचाकी चोरणा-या टोळीचा पदार्फाश केला आहे.
रांजणगावला दुचाकी चोरांची टोळी गजाआड
ठळक मुद्दे२२ दुचाकी हस्तगत : ७ जणांना अटक, शनिवारपर्यंत पोलिस कोठडी रांजणगाव गणपती, शिक्रापूर, चंदननगर, पुणे येथून एकूण २२ दुचाकी चोरल्याची कबूली