धनंजय साळुंखे यांनी त्यांचे भाचे अक्षय वाघमारे (रा. कुंभारगल्ली, दौंड) यांना दुचाकी (क्र. एमएच ४२ ए वाय २८८२) वापरावयास दिली होती. गुरुवारी सकाळी अक्षय यांनी सलून दुकानातील कॉस्मेटीक व इतर साहित्य खरेदीसाठी ८७ हजार रुपये घरातून आणले होते. ते पैसे त्यांनी दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवले. पोलीस ठाण्याच्या परिसरात असणाऱ्या एका हॉटेलनजीक असलेल्या सलून दुकानात अक्षय गेला. त्यावेळी हॉटेलसमोर दुचाकी हँण्ल लॉक करुन उभी केली होती. दरम्यानच्या काळात, चोरट्यांनी ही दुचाकी पळवली. अन् त्याबरोबर ८७ हजार रुपयेही गेले. काही वेळाने ज्या ठिकाणी गाडी लावली तेथे अक्षय आले असता त्यांना गाडी दिसून आली नाही. त्यानंतर तेथील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता त्यामध्ये काही व्यक्ती दुचाकी घेऊन जात असल्याचे समोर आले.
दुचाकीही गेली अन् ८७ हजारही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:09 IST