शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक महिला दिनाच्या औचित्याला दोन विद्यार्थिनी जागतिक विक्रमासाठी लावणार कस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 21:42 IST

 पुणे: पौड इंटरनॅशनल मार्शल आर्ट्स असोसिएशनच्या प्रशिक्षणार्थी असलेल्या मुळशी तालुक्यातील चांदे गावाची सुकन्या वैष्णवी मांडेकर व पुणे महानगरातील अस्मिता जोशी या दोघी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एका नव्या जागतिक विक्रमासाठी सज्ज झाल्या आहेत.

ठळक मुद्देएकावेळी दोघी खिळ्यांच्या दोन फळ्यांमध्ये झोपून अत्यंत कमी वेळेत १ हजार किलो फरशा फोडून घेणार आहेवैष्णवी व अस्मिता या दोन महाविद्यालयीन युवती या नव्या विक्रमासाठी गेली सहा महिने अथक परिश्रम घेत आहेत. 

 पुणे: पौड इंटरनॅशनल मार्शल आर्ट्स असोसिएशनच्या प्रशिक्षणार्थी असलेल्या मुळशी तालुक्यातील चांदे गावाची सुकन्या वैष्णवी मांडेकर व पुणे महानगरातील अस्मिता जोशी या दोघी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एका नव्या जागतिक विक्रमासाठी सज्ज झाल्या आहेत. याबाबत अधिक माहिती देताना इंटरनॅशनल मार्शल आर्टस असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी व कराटेचे प्रशिक्षक विक्रम मराठे यांनी सांगितले, की वैष्णवी व अस्मिता या दोघी गेली दहा वर्षांपासून आमच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असून येत्या ८ मार्च रोजी आतापर्यंत कोणीही न दाखवलेलं धाडस दाखवून एक जागतिक विक्रम करण्याच्या तयारीत आहे.     या साहसी खेळाच्या प्रात्यक्षिकाचा थरार अनुभवण्यासाठी अधिकाधिक प्रेक्षकांनी गुरुवार ८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता कॅम्प परिसरातील नेहरू मेमोरियल हॉलमध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन इंटरनॅशनल मार्शल आर्ट्स असोसिएशचे कार्याध्यक्ष दिलीप पाटील व खेळाडू वैष्णवी मांडेकरचे वडील दादाराम मांडेकर यांनी केले आहे. वैष्णवी मांडेकर ही ६ इंच लांबी असलेल्या खिळ्यांच्या फळ्यांमध्ये सँडविचसारखी मधोमध झोपलेली असेल आणि तिच्यावर अस्मिता जोशी एक  ६ इंच लांबीच्या खिळ्यांची फळी व वर छातीवर फरशामध्ये सँडविच असेल. छातीवर ठेवलेल्या शहाबाद फरशा १८ एलबीएसच्या हातोडीने शिहान विक्रम मराठे कमीत कमी वेळात फोडणार आहेत. यापूर्वी ८ मार्च २०१५ रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या असोसिएशनच्या ४ विद्यार्थिनी प्रत्येकीने खिळ्यांच्या फळीवर पाठीवर झोपून व्यक्तिगत एक हजार किलो फरशा अंगावर फोडून घेतल्या होत्या. त्याची २०१६ च्या लिमका बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली होती. यावेळी एकावेळी दोघी खिळ्यांच्या दोन फळ्यांमध्ये झोपून अत्यंत कमी वेळेत १ हजार किलो फरशा फोडून घेणार आहे. वैष्णवी व अस्मिता या दोन महाविद्यालयीन युवती या नव्या विक्रमासाठी गेली सहा महिने अथक परिश्रम घेत आहेत. आम्ही या नव्या विक्रमासाठी पूर्णपणे सज्ज असून आम्हालाही जागतिक विक्रमाची उत्सुकता लागली आहे. हा विक्रम प्रस्थापित करून सामान्य महिलांचा आत्मविश्वास वाढवण्यात आमची मदत या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने होणार असल्याची प्रतिक्रिया दोघींनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

,....................................

टॅग्स :PuneपुणेPaudपौड