शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

येरवड्यातील युवकाच्या खूनप्रकरणी दोन जण ताब्यात, विधिसंघर्षग्रस्त बालकाचा आरोपींमध्ये समावेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 13:21 IST

किरकोळ कारणावरून झालेल्या वादात दोघा मित्रांनी मिळून निखील श्रीकांत कडाळे याच्या डोक्यात दगड घालून मंगळवारी रात्री खून केला होता.

ठळक मुद्देकिरकोळ वादातून दारूच्या नशेत मित्रानीच केला खून या गुन्ह्यातील फरार आरोपींना शोधण्यासाठी एक विशेष पथक तैनात करण्यात आले होते

विमाननगर - येरवडा मेंटल कॉर्नर समोरील मैदानात मंगळवारी रात्री झालेल्या खून प्रकरणी येरवडा पोलिसांनी गुरुवारी सकाळी दोघांना ताब्यात घेतले . किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दोघा मित्रांनी मिळून निखील श्रीकांत कडाळे (वय २३ रा. पंचशीलनगर, येरवडा) यांच्या डोक्यात दगड घालून खून केला होता. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अजिंक्य विजय कांबळे (वय २२रा.पंचशील नगर येरवडा ) व एका विधीसंघर्ष बालकास ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजिंक्य व त्याचा दुसरा मित्र हे निखिलचे मित्र आहेत.मंगळवारी रात्री उशिरा हे तिघेजण कॉमर्स झोन समोरील मोकळ्या मैदानात दारू पित होते.यावेळी त्यांची किरकोळ कारणावरून वादावादी झाली. त्यातून चिडून अजिंक्य त्याच्या साथीदाराने निखिल यांचा बिअरच्या बाटलीने गळा चिरून व डोक्यात दगड घालून खून केला. खून करून दोघे फरारी झाले होते. बुधवारी सकाळी निखिलचा खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला. येरवडा पोलिसांनी तत्काळ गुन्ह्याचा तपास सुरू केला होता .या गुन्ह्यातील फरार आरोपींना शोधण्यासाठी एक विशेष पथक तैनात करण्यात आले होते . गुरुवारी सकाळी या दोघांना या पथकाने ताब्यात घेतले. दोघांनी निखिलचा खून केल्याची कबुली दिली आहे . परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त दीपक साकोरे, सहायक पोलीस आयुक्त गणेश गावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद महाजन, पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास केला.

टॅग्स :YerwadaयेरवडाCrimeगुन्हाPoliceपोलिसMurderखून