शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

Pune News| 'तो' वाचला पण त्याला वाचवायला गेलेले दोघेजण बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2022 18:50 IST

युवकाला वाचवण्यास धावून गेलेले दोघेजण बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे....

वडगाव कांदळी (पुणे): बोरी बुद्रुक (ता.जुन्नर) परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नदीपात्रात बंधाऱ्याच्या पाण्यात बुडत असलेल्या युवकाला वाचवण्यास धावून गेलेले दोघेजण बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. युवकाला वाचवण्यात यश आले मात्र त्यानंतर दोघेही या पाण्यात बुडण्याची घटना समोर आली आहे. दोघेजण कुकडी नदीच्या पाण्याच्या प्रवाहात बुडून वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हे दोघेजण बुडाल्याची घटना शनिवार (दि १) रोजी सकाळी ११ वाजण्याचे सुमारास घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बोरी बुद्रुक (ता.जुन्नर)येथील अनिल संदीप धुळे (वय- १७) हा युवक पोहण्यासाठी गेला असता तो बुडू लागला असल्याचे पाहून जवळच उभे असलेल्या अमोल संदीप धुळे (वय -१९) व बापू आनंदा धुळे (वय- ३५) या दोघांनी पाण्यात उड्या घेऊन वाचवण्याचा प्रयत्न केला. बापू धुळे यांनी अनिल धुळे याला पाण्याबाहेर काढून वाचवले, परंतु अमोल धुळे हा नदीच्या पात्रात बुडत असल्याचे पाहून त्याला वाचवायला गेले असता पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने बापु धुळे व अमोल धुळे पाण्याचा प्रवाह बेपत्ता झाले असून घटनास्थळी जुन्नर रेस्क्यु टीम दाखल झाली आहे. संध्याकाळी उशिरापर्यंत शोध कार्य सुरू होते.

गेल्या दोन महिन्यांपासून मुसळधार पाऊस चालू असल्याने ओढ्या नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी चालू असून ते सर्व पाणी कुकडी नदीला येत आहे. नदीवर कोणीही पोहायला जाऊ नयेल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. आळेफाटा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहायक पोलिस निरीक्षक सुनिल बडगुजर त्यांचे सहकारी, निमगावसावाचे मंडलाधिकारी नितीन चौरे, बोरी बुद्रुकच्या तलाठी शितल गर्जे यांनी तात्काळ भेट दिली.

टॅग्स :Puneपुणेdrowningपाण्यात बुडणे