शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये ‘कोरोना’च्या तपासणीसाठी आणखी दोन जण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 20:34 IST

पुण्यातील रूग्णालयात निरीक्षणाखाली असलेल्यांपैकी तीन प्रवाशांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह

ठळक मुद्देनमुने एनआयव्हीकडे पाठवले : चारपैकी तीन जणांची तपासणी निगेटिव्ह 

पुणे : चीनहून आलेल्या आणखी दोन जणांना मंगळवारी ‘कोरोना’च्या तपासणीसाठी नायडू रूग्णालयात दाखल केले आहे़. या दोघांच्याही घशातील द्रव पदार्थाचे नमुने एनआयव्ही (राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था)मध्ये तपासणीसाठी पाठविले आहेत. सद्यस्थितीला या रूग्णालयात एकूण चार जणांना निरिक्षणाखाली ठेवले असून, यापैकी तीन जणांची तपासणी ही निगेटिव्ह आली असून एक जणाचा निदान अहवाल गुरूवारी प्राप्त होणार आहे. पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख रामचंद्र हंकारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनसहकोरोना चा प्रादुर्भाव झालेल्या भागातून पुण्यात आलेल्या प्रवाशांची संख्या आजमितीला चार असून आहे. यापैकी दोन जणांची घशातील द्रवपदार्थाचे नमूने दोनदा एनआयव्हीद्वारे तपासले आहेत. या दोन्ही तपासण्यांमध्ये त्यांना कोरोनाची लागण नसल्याचे निष्पन्न झाले आहे. या दोघांसह मंगळवारी आलेल्या एका प्रवाशाचे व बुधवारी सकाळी आलेल्या एका प्रवाशास नायडू रूग्णालयात तपासणीसाठी ठेवले आहे. या दोघांच्याही घशातील द्रवपदार्थाचे नमूने आज एनआयव्हीकडे पाठविले आहेत. यापैकी एका प्रवाशाचा तपासणी अहवाल आला असून, तो निगेटिव्ह आहे. त्यामुळे आणखी एकदा तपासणी झाल्यावर संबंधित तीन जणांना रूग्णालयातून सोडणार आहे.कोरोना विषाणूचा उद्रेक चीन देशातील वुहान या शहरात झाल्याचे चीनने ३१ डिसेंबर,२०१९ रोजी जाहिर केले होते. त्यानंतर चीनच्या इतर शहरासह जपान, थायलंडसह १४ देशांमध्ये या आजाराचे रूग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर या आजाराचा प्रादुर्भाव भारतात होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.२८ जानेवारीपर्यंत विमानतळावरील स्क्रिनिंग आणि क्षेत्रिय पातळीवरील सर्व्हेक्षण यातून बाधित भागातून आलेले महाराष्ट्रातील २३ प्रवासी आढळले आहेत. यापैकी १० प्रवाशांना सौम्य सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळल्याने त्यांना विलगीकरण (कोरोना तपासणीसाठीच्या) कक्षात भरती केले आहे. या प्रवाशांपैकी ६ जण मुंबईत, २ पुण्यात व नांदेड येथे १ जण भरती आहे. आज पुण्यात नव्याने २ जणांना भरती केले असून, पुण्यातील रूग्णालयात निरिक्षणाखाली असलेल्यांपैकी तीन प्रवाशांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आहेत.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोनाhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरchinaचीन