शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

खळदजवळ अपघातात २ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 02:38 IST

जेजूरीहून देवदर्शन करून मुंबईकडे परतणाऱ्या भाविकांची लक्झरी बस व हडपसरहून जेजूरी कडे जाणा-या कारचा अपघात होवून कारमधील दोन जण ठार झाले. यामध्ये कार चालकाचा समावेश आहे. हडपसर-जेजुरी पालखी मार्गावर कायम अपघाती जागा असणा-या ठिकाणी हा अपघात झाला.

सासवड - जेजूरीहून देवदर्शन करून मुंबईकडे परतणाऱ्या भाविकांची लक्झरी बस व हडपसरहून जेजूरी कडे जाणा-या कारचा अपघात होवून कारमधील दोन जण ठार झाले. यामध्ये कार चालकाचा समावेश आहे. हडपसर-जेजुरी पालखी मार्गावर कायम अपघाती जागा असणा-या ठिकाणी हा अपघात झाला.विजय शिवाजी कांबळे (ंवय ४०, रा उजळंब (लातूर) असे नाव असून दुस-या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. कारमध्ये तीन व्यक्ती असल्याचे समजते. लग्न सराई व जेजूरीला खंडेरायाच्या दर्शनासाठी येणारे नवदांपत्यांचे यावेळी वाहतूक रखडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. सासवड पोलिसांनी त्वरीत हालचाली करून वाहतूक सुरळीत केली.लक्झरी चालक बैचेन निसाद (मुंबई) यास पोलिसांनी अधिक तपासासाठी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असल्याचे पोलीस निरिक्षक क्रांती कुमार पाटील यांनी सांगीतले.मदत करणा-यांनाच मारहाणया घटनेत खळद येथील ग्रामस्थांनी जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी मदत केली. याच वेळी लक्झरीमधील काही युवकांनी गैरसमजातून जखमींना मदत करणा-या ग्रामस्थांना मारहाण केली. लक्झरीमध्ये महिला भाविक असल्याने ग्रामस्थ त्या युवकांना समजावत होते. या युवकांनी मद्य प्राशन केल्याने कोणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. या मारहाणीनंतर जखमींना मदत करायची कशी, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला. यानंतर संतप्त ग्रामस्थांनी दोन युवकांविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यावरून फिर्याद नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणे