शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दौंड येथे विद्युत महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना लाच घेताना पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 21:05 IST

मीटरची पुन्हा जोडणी करून जास्त बिल न पाठविण्यासाठी तक्रारदारकडून ६० हजारांची मागणी दोघांवर गुन्हा दाखल

ठळक मुद्दे दोघांवर गुन्हा दाखल

दौंड : दौंड येथील विद्युत महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता मिलिंद डोंबाळे यांना ३० हजारांची लाच खासगी व्यक्ती विक्रम पाटणकर (रा. नानवीज, ता. दौंड) यांच्यामार्फत घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत चौधरी यांनी दिली. याप्रकरणी मिलिंद डोंबाळे (रा. पुणे) आणि विक्रम पाटणकर (रा. नानवीज, ता. दौंड) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खडकी (ता. दौंड) येथील तक्रारदार यांच्या मीटरची पुन्हा जोडणी करून जास्त बिल न पाठविण्यासाठी तक्रारदारकडून ६० हजारांची मागणी महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता मिलिंद डोंबाळे यांच्याकडून करण्यात आली होती. दरम्यान, मध्यस्थ व्यक्तीच्या माध्यमातून ३० हजारांवर तडजोड झाली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाºयांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील, पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला.

 

टॅग्स :daund-acदौंडCorruptionभ्रष्टाचारmahavitaranमहावितरण