शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

वेगाची क्रेझ नडली, बाईकच्या धडकेत दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 03:43 IST

महागड्या स्पोर्ट्स बाईकची क्रेझ तरुणात वाढत चालली असून रात्री-अपरात्री वाऱ्याच्या वेगाने जाण्याचे वेड लागले आहे़ या वेडामुळे मोटारसायकलवरील दोघा तरुणांना आपला जीव गमवावा लागला असून स्वत: स्पोर्ट्स बाईकस्वारही गंभीर जखमी झाला आहे.

पुणे - महागड्या स्पोर्ट्स बाईकची क्रेझ तरुणात वाढत चालली असून रात्री-अपरात्री वाऱ्याच्या वेगाने जाण्याचे वेड लागले आहे़ या वेडामुळे मोटारसायकलवरील दोघा तरुणांना आपला जीव गमवावा लागला असून स्वत: स्पोर्ट्स बाईकस्वारही गंभीर जखमी झाला आहे़संजीव सिंग जयंत सिंग (वय २४) आणि प्रल्हाद सिंग कर्नल सिंग (वय ४०, दोघे रा़ कुमार पाल्म्स लेबर कँप, उंड्री, मूळ जम्मू काश्मीर) अशी मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत़ रेहान रिझवान कॉन्ट्रॅक्टर (वय २१, रा़ कोणार्कपूरम, कोंढवा) व त्याचा मित्र जिया इक्बाल हबीब (वय २०) हे दोघे जखमी झाले आहेत़ हा अपघात एनआयबीएम रोडकडून कडनगर चौकाकडे जाणाºया रोडवरील कुमार पाल्म्स लेबर कॅम्पसमोर रविवारी रात्री साडेअकरा वाजता घडला़याबाबत कोंढवा पोलिसांनी सांगितले, की रेहान कॉन्ट्रॅक्टर हा आपला मित्र जिया इक्बाल हबीब याला घेऊन स्पोर्ट्स बाईकवरून एनआयबीएम रोडकडून कडनगर चौकाकडे जात होते़ त्याने समोरून येणाºया मोटारसायकलला जोराने धडक दिली़ही धडक इतकी जोरात होती, की समोरच्या मोटारसायकलचे चाक निखळून पडले़ त्यावरील संजीव सिंग आणि प्रल्हाद सिंग यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला़कॉन्ट्रॅक्टर याच्या गाडीचेही मोठे नुकसान झाले़ रेहान व जिया हे दोघेही जखमी झाले आहेत़ कोंढवा पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणे