शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

गायी आणताना दोन दिवसांचा केला प्रवास -अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 01:20 IST

तो काळ १९७५ चा असेल. त्यावेळी अप्पासाहेबकाका आणि भाऊसाहेबकाकांनी गायी आणायच्या ठरवल्या.

बारामती : तो काळ १९७५ चा असेल. त्यावेळी अप्पासाहेबकाका आणि भाऊसाहेबकाकांनी गायी आणायच्या ठरवल्या. त्या गायी आणण्यासाठी बेंगलोरला मला आणि राजूदादाला पाठवले. त्यावेळी आम्ही दोघे १५— १६ वयाचे असू. स्कूटर घेऊन जाणाऱ्या तीन ट्रकमध्ये २४ गायी आम्ही आणल्या. गायी आणताना दोन रात्री व दोन दिवसांचा प्रवास केला. या दरम्यान, गायींचे मध्येच दूध काढले, त्यानंतर ते दूध हॉटेलवाल्यांना विकले. शेण काढायचे. रस्त्याला दिसेल तेथे पाणी शेंदायचे. आज पवार कुटुंबीयांनी मिळविलेल्या यशामागे आम्ही केलेले बरेच काम आहे, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कुटुंबीयांसमवेतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.बारामती एमआयडीसीतील गदिमा सभागृहात अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांच्या एकसष्टीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पवार यांनी मिश्कीलपणे कौटुंबिक आठवणींना उजाळा दिला. तसेच बंधुत्वाच्या लहानपणीच्या आठवणी जागविल्या. या वेळी पवार म्हणाले, आबा (ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे वडील गोविंदराव पवार) आणि बाईंनी (ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आई शारदाबाई पवार) संपूर्ण पवार कुटुंब वाढविले. त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून दुसºया पिढीने देखील खूप कष्ट केले. अडचणीच्या काळातही प्रत्येकाला संस्कार देऊन शिक्षित केले. एसटीच्या प्रवासात जेवणाचे डबे विटायचे. मात्र सगळ्या काकांनी तसले डबे खाऊन आपापले शिक्षण पूर्ण केले. तिसरी पिढी म्हणून आमच्यावर प्रेशर होते.राजूदादा माझ्यापेक्षा १३ महिन्यांनी मोठा आहे. आमचे एकमेकांना सगळे माहिती आहे. त्यामुळे मी राजकारणात आल्यावर आम्ही एकमेकांचे काहीच सांगितले नाही. सर्व झाकून ठेवले. तुम्ही किती वाकून पाहिले तरी तुमच्या हाती काहीच येणार नाही, असे म्हणून अजित पवार काही क्षण थांबले. त्यानंतर ‘आमचे बर चाललंय, तुम्हाला पवार अजूनही समजलेच नाहीत, असे मिश्कीलपणे पवार म्हणाले. त्यावर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.या वेळी बारामती एमआयडीसीतील गदिमा सभागृहात अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनीदेखील त्यांच्या भाषणातून कौटुंबिक आठवणींना उजाळा दिला.>...गिरगावच्या चौपाटीवरील वाळूत आम्ही रात्र काढलीत्यावेळी शरदकाका मुंबईत होते. आम्ही मुंबईत एका कामासाठी गेलो होतो. माझ्याकडून काही चूक झाली होती. शरदकाका रागावतील या भीतीने आम्ही तिकडे गेलोच नाही. मात्र, मुंबईत गिरगावच्या चौपाटीवरील वाळूत आम्ही रात्र काढली. अशी जुन्या काळातील मुंबईची आठवण माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितली. ही आठवण ऐकताना सभागृह स्तब्ध होते.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार