शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कोब्रा सापाचे दोन कोटींचे विष जप्त : विक्रीसाठी पुण्यात आलेल्या चौघांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 19:39 IST

बेकायदेशीररीत्या कोब्रा जातीच्या सापाचे तब्बल एक लीटर विष जवळ बाळगणार्‍या चौघांना गुन्हे शाखेच्या युनिट 2 पथकाने अटक केली. या विषाची आंतराष्ट्रीय बाजारामध्ये किंमत 2 कोटी 28 हजार 300 रुपये आहे. चौघांनाही शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनाविन्यात आली आहे. 

 

पुणे : बेकायदेशीररीत्या कोब्रा जातीच्या सापाचे तब्बल एक लीटर विष जवळ बाळगणार्‍या चौघांना गुन्हे शाखेच्या युनिट 2 पथकाने अटक केली. या विषाची आंतराष्ट्रीय बाजारामध्ये किंमत 2 कोटी 28 हजार 300 रुपये आहे. चौघांनाही शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनाविन्यात आली आहे. हिमांशु तिलक साहू (28, रा. कांकेर, छत्तीसगड),  दशरथ निरंजन हलदार (38, रा. रायपूर, छत्तीसगड), विकास मनोहर भैसारे (34, रा. आरमोरी, गडचिरोली), महेंद्र रावसाहेब जाधव (37, अंबड रोड, जालना) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सहायक पोलिस निरीक्षक अनिल पांडुरंग ऊसुलकर यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  गुरूवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कॅम्प परिसरात चौघेही संशयित आरोपी कोब्रा जातीचे विष विक्रीसाठी येणार असल्याची खबर युनिट 2 च्या गुन्हे शाखेला मिळाला. त्यानुसार कॅम्प परिसरात चौघेही आल्यानंतर संशयीतरित्या हालचालीवरून चौघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून कोब्रा सापाचे एक हजार मिली सापाचे विष त्यांच्याकडून जप्त करण्यात आले. चौघांवर वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी दुपारी चौघांना पोलिस कोठडीसाठी न्यायालयात हजर करण्यात आले. चौघांपैकी दोघे छत्तीसगड येथील रहिवासी असून एक जण जालना तर एक जण गडचिरोली येथील रहिवासी आहे. त्यांनी हे विष नेमके कोठून आणले, ते पुण्यात कोणाला विकणार होते ? त्यांच्याकडे आणखी काही प्रतिबंधित वन्यप्राणी सामग्री आहे का याचाही तपास पोलिसांना करायचा आहे. जप्त विष हे मोठ्या प्रमाणात असून यामागे कोणती आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग आहे का ? याचा तपास होणे गरजेचे असल्याने चौघांनाही सात दिवस पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील भानुप्रिया पेटकर यांनी केली. गुन्हे शाखेच्या युनिट 2 चे पोलिस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जयवंत जाधव करीत आहेत. 

टॅग्स :snakeसापCourtन्यायालयArrestअटकCrime Newsगुन्हेगारी