शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
2
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
3
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
4
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
5
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
6
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
7
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
8
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
9
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
10
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
11
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
12
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
13
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
14
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
15
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
16
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
17
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
18
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
19
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
20
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!

फुकट्या प्रवाशांकडून अडीच कोटी वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 02:23 IST

मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील विविध मार्गांवर विनातिकीट प्रवास करणाऱ्या ४० हजार २३३ प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून २ कोटी ४३ लाख रुपयांंचा दंड वसूल करण्यात आला आहे.

पुणे  - मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील विविध मार्गांवर विनातिकीट प्रवास करणाऱ्या ४० हजार २३३ प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून २ कोटी ४३ लाख रुपयांंचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर या तपासणीसह विनातिकीट प्रवासासह इतर प्रकरणांमध्ये एकूण ४ कोटी ६८ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला. एकूण ९० हजार प्रकरणांमध्ये हा दंड आकारण्यात आला.रेल्वेकडून एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. पुणे विभागातील पुणे-मळवली, पुणे-बारामती, पुणे-मिरज व मिरज-कोल्हापूर या मार्गांवर प्रवाशांची तपासणी करण्यात आली. मागील वर्षी याच कालावधीत ७५ हजार ५४४ प्रकरणांमध्ये ४ कोटी ३४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर व अतिरिक्त व्यवस्थापक प्रफुल्ल चंद्रा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. रेल्वेकडून सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येते. त्यामुळे प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करणे टाळावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेPuneपुणे