शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

खेड तालुक्यात दुचाकीचोरांचा धुमाकूळ, आठ महिन्यांत २७ दुचाकी लंपास, एकाही घटनेचा तपास नाही  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 02:34 IST

खेड तालुक्यात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. जानेवारी २०१७ ते आजतागायत आठ महिन्यांत जवळपास २७ दुचाकींवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. राजगुरुनगर शहरात दुचाकीचोरांची टोळी सक्रिय आहे. मात्र, अद्यापही कुणाला अटक करण्यास पोलिसांना यश आलेले नाही.

राजगुरुनगर : खेड तालुक्यात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. जानेवारी २०१७ ते आजतागायत आठ महिन्यांत जवळपास २७ दुचाकींवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. राजगुरुनगर शहरात दुचाकीचोरांची टोळी सक्रिय आहे. मात्र, अद्यापही कुणाला अटक करण्यास पोलिसांना यश आलेले नाही.दुचाकीचोरींच्या सत्रामुळे शहरासह तालुक्यातील वाहनांची सुरक्षा धोक्यात आली आहे. दुचाकीचोरीचा शोध लावण्यात खेड पोलीस अपयशी ठरत आहेत. राजगुरुनगर शहरीकरणाचा विस्तार वाढला आहे. औद्योगिकीकरण वाढल्याने कामगारांनी या शहराला पसंती देत आहेत. त्यामुळे शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरासह तालुक्यात वाहनांची गर्दी वाढली असताना चोरट्यांनी दुचाकीचोरीवर लक्ष्य केले आहे. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून २७ दुचाकी चोरीला गेल्या असल्याबाबत खेड पोलीस दप्तरी नोंद झाली आहे. पोलीस ठाण्यातील कर्मचाºयांना वाहनचोरीचा छडा लावण्यात अपयश आले आहे. राजगुरुनगर पोलिसांनी याबाबत कारवाई करीत दुचाकीचोरांच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे. गाड्या चोरीला जाण्याचे वाढते प्रमाण पाहता दुचाकीमालक धास्तावले आहेत. भरदिवसा दुचाकीचोरी होत आहेत. आठ महिन्यांत २७ गाड्यांची चोरी ही बाब अत्यंत गंभीर आहे.यापैकी एकही गाडीचोरीचा गुन्हा उघडकीस आलेला नाही. गाड्या चोरीस जाण्याचे वाढते सत्र राजगुरुनगरकरांना धोकादायक ठरत आहे. पोलीस प्रशासनाने याची वेळीच दखल घेऊन दुचाकीचोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे.राजगुरुनगर शहर पोलीस ठाण्यातील आठ महिन्यंतील गुन्हे : विनयभंग १७, खून ५, खुनाचा प्रयत्न ७, बलात्कार ६, जबरी चोरी १०, घरफोडी १०, मारामारी ११, फसवणूक १, अपहरण १०, दरोडे २, अपघाती मृत्यू २२, दुखापती २१, मोटारसायकलचोरी २७, जुगार ७, दारू ५५, ठकबाजी १३ असे एकूण २०५ गुन्हे दाखल आहेत.राजगुरुनगर शहरातून (दि. १०) रात्री समतानगर वाडारोड, वाळुजस्थळ, राक्षेवाडी येथून तीन मोटारसायकल चोरट्यांनी चोरल्या आहेत. याबाबत खेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणे