पुणे : केंद्र शासनाकडे सादर करावयाच्या स्मार्ट सिटी प्रस्तावासाठी पुणेकरांची मते जाणून घेतली जात आहेत, दुसऱ्या टप्प्यासाठी एका दिवसात नागरिकांनी भरभरून प्रतिसाद देत वेगवेगळ्या ६ क्षेत्रांसाठी अडीच लाख मते (प्राधान्यक्रम) नोंदविली. पालिकेकडे एकूण ९ लाख २४ हजार ८२६ मते जमा झाली आहेत. या मताच्या आधारे स्मार्ट पुणे कसे असेल याचा आराखडा तयार केला जाणार आहे.महापालिकेच्या वतीने दुसऱ्या टप्प्यात वाहतूक, पाणी व मलनिस्सारण, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण, सुरक्षितता, ऊर्जा या विषयांवर नागरिकांची आॅनलाइन मते मागविली होती. ३ ते ११ आॅक्टोबर २०१५ या कालावधीमध्ये ही मते जाणून घेण्यात आली. आॅनलाइन पद्धतीने मते जाणून घेण्यासाठी या सर्व्हेक्षणामध्ये महापालिकेचे कमर्चारी, महाविद्यालयांतील विद्यार्थी असे सुमारे ८०० स्वयंसेवक त्यात सहभागी झाले आहेत. आतापर्यंत या सर्व्हेक्षणात एकूण ६६ हजार ३०१ जणांनी सहभाग घेतला. स्मार्ट सिटीच्या संकेतस्थळाला एकूण १ लाख ९५ हजार ३२६ हिट्स मिळाल्या. पहिल्या टप्प्यातही पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद देऊन आपली मते व्यक्त केली होती. नागरिकांच्या मतांच्या आधारे स्मार्ट पुण्याबाबतचा प्रस्ताव तयार केला जाणार आहे. परदेशातील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा समावेशही करण्याचा प्रयत्न केला जात आहे.< नागरिक सहभागात पुणे आघाडीवर१ स्मार्ट सिटी कशी असावी यामध्ये नागरिकांचा सहभाग असणे बंधनकारक आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी निवडल्या गेलेल्या सर्व १०० शहरांमध्ये नागरिकांचा सहभाग मिळविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.२ नागरिकांच्या सहभागामध्ये पुणे देशात सर्वात आघाडीवर आहे. आतापर्यंत पहिला व दुसरा टप्पा मिळून १० लाखांच्यावर नागरिकांनी याकरिता आपली मते नोंदविली आहे.३ नागरिकांच्या सहभागाला जास्त गुण ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पहिल्या २० शहरांत निवड होण्यासाठी पुण्याचा दावा भक्कम मानला जात आहे.
एका दिवसात मिळाली अडीच लाख स्मार्ट मते
By admin | Updated: October 12, 2015 01:40 IST