शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डासोत्पत्तीची ठिकाणे नष्ट न केल्याने वीस जणांना कोर्टाचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 19:58 IST

डेंग्यूचे वाढते रुग्ण आणि डेंग्यूच्या डासांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे.

ठळक मुद्देपालिकेकडून खटले दाखल : न्यायालयाने सुनावला दंडडासांची पैदास होत असल्याने जास्त दिवस पाणी साठून राहणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे

पुणे : शहरात डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून पावसाळ्यापुर्वीच तपासणीला सुरुवात करण्यात आली होती. डासोत्पत्तीची ठिकाणे शोधून नागरिकांना नोटीस देण्यास सुरुवात करण्यात आली होती. वारंवार नोटीस आणि सूचना देऊनही उपाययोजना न करणाऱ्या वीस जणांविरुद्ध पालिकेने न्यायालयात दाखल केलेल्या खटल्यांमध्ये नागरिकांना दंड सुनावण्यात आला आहे.डेंग्यूचे वाढते रुग्ण आणि डेंग्यूच्या डासांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे. स्वच्छ पाण्यामध्ये डेंग्यूच्या डासांच्या अळ्या होत असल्याने सात दिवसांपेक्षा अधिक काळ पाणी साठवून ठेऊ नये, पाणी साठून राहणाऱ्या ठिकाणांची स्वच्छता करावी, पाण्याच्या टाक्या, हौद, खाणी, तळी, खड्डे, कारंजे, कमळ पॉंड, टायर, झाडांच्या कुंड्यांमध्ये पाणी साठून राहत असल्यास त्याकडे लक्ष देण्यासंदर्भात आरोग्य विभागाकडून नागरिकांना वारंवार आवाहन केले जाते. गेल्या काही महिन्यात डेंग्यूचे रुग्ण आढळलेल्या सोसायट्यांसह आसपासच्या परिसरात पाहणी करुन डासोत्पत्तीची ठिकाणे शोधून संबंधित नागरिकांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. आतापर्यंत आरोग्य विभागाकडून १ हजार ६०० नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. बहुतांश नागरिकांनी पाणी साठून राहण्याच्या जागा स्वच्छ केल्या. परंतू, काही नागरिक वारंवार सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले होते. अशा वीस नागरिकांंविरुद्ध पालिकेने न्यायालयात खटले दाखल केले होते. या सर्व नागरिकांना न्यायालयाने प्रत्येकी २०० रुपयांचा आर्थिक दंड सुनावला आहे. यामध्ये बिबवेवाडी, मुंढवा, टिळक रस्ता, कोंढवा, हडपसर, विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील सोसायट्यांच्या समावेश असून सर्वाधिक नागरिक हडपसर भागातील आहेत. ====महापालिकेच्या हडपसर येथील डेपोच्या व्यवस्थापकांवरही खटला दाखल करण्यात आला होता. या खटल्याचा निकाल अद्याप लागला नसल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ====शहरीकरण वाढत चालले आहे तशा डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. स्वच्छ पाण्यामध्ये डेंग्यूच्या डासांची पैदास होत असल्याने जास्त दिवस पाणी साठून राहणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. आम्ही आतापर्यंत १६०० नागरिकांना नोटीसा बजावल्या होत्या. यातील वीस जणांनी उपाययोजना न केल्याने त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटले दाखल करण्यात आले होते. या सर्वांना न्यायालयाने आर्थिक दंड सुनावला आहे. - डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य प्रमुख

टॅग्स :Puneपुणेdengueडेंग्यूPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCourtन्यायालय