अशा स्थितीत अंजना साहेबराव झेंडे, शकुंतला रामहरी मोरे, सरस्वती मारुती तापकीर या तीन विवाहित बहिणींनी तसेच जयश्री इंगूळकर, संजय पठारे व प्रमोद पठारे या एका स्वर्गीय बहिणीच्या तीन मुलांनी भाचे भोसे गावचे उपसरपंच दिगंबर लोणारी यांच्या शब्दाला मान देत चंद्रकांत लोणारी व दत्तात्रय लोणारी या दोन शेतकरी भावांना कसलाही मोबदला न घेता कोट्यवधी रुपये मूल्य असलेल्या पंचवीस एकर जमिनीचे नोंदणीकृत हक्कसोड पत्र करून देत एक अनोखा पायंडा पाडून समाजासमोर एक वेगळा आदर्श उभा केला आहे.
फोटो ओळ : भोसे (ता. खेड) येथे आत्यांच्या निर्णयाचे पेढे भरून स्वागत करताना उपसरपंच दिगंबर लोणारी.(छाया : भानुदास पऱ्हाड)