शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

श्रुतीच्या खुनाच्या शोधासाठी बारा पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 01:21 IST

पुणे : घरामधून अपहरण करून लैंगिक अत्याचारानंतर खून करण्यात आलेल्या चिमुकलीच्या मारेक-याला शोधण्यासाठी पोलीस जंग जंग पछाडत आहेत.

पुणे : घरामधून अपहरण करून लैंगिक अत्याचारानंतर खून करण्यात आलेल्या चिमुकलीच्या मारेक-याला शोधण्यासाठी पोलीस जंग जंग पछाडत आहेत. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या सूचनांवरून तब्बल बारा पथके नेमण्यात आली आहेत. यामध्ये परिमंडल दोनसह गुन्हे शाखेच्या विविध पथकांचा समावेश असल्याची माहिती उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली. दरम्यान, गुन्ह्यासंदर्भात काही धागेदोरे मिळाले असून त्यादृष्टीने तपास सुरू आहे. मात्र, पोलीस कोणत्याही निष्कर्षाप्रत आलेले नाहीत.श्रुती विजय शिवगणे (वय अडीच वर्षे) या चिमुकलीचा रविवारी मध्यरात्री साडेबारा ते सकाळी साडेसहाच्यादरम्यान घरामधून अपहरण करून खून करण्यात आला. तिचा मृतदेह सिंहगड रस्त्यावरील प्रयेजा सिटी सोसायटीच्या मागील मोकळ्या जागेत मिळून आला होता. दरम्यान, तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे शवविच्छेदन अहवालामधून समोर आले.घटनास्थळावर आढळून आलेला श्रुतीचा मृतदेह आणि एकूणच वातावरण हृदयद्रावक होते. श्रुती रविवारी रात्री घरामधून गायब झाल्यापासून ६० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तिचा रात्रभर शोध घेत होते. रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास तिचा मृतदेह आढळून आल्यानंतर तिचा खून झाल्याचे निष्पन्न झाले.याप्रकरणी वडील विजय शिवराज शिवगणे (वय ३२, रा. लगडमळा, वडगाव धायरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनीअज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मूळचे परभणीचे असलेले शिवगणे कुटुंबीय दोन महिन्यांपूर्वी पोटाची खळगी भरण्यासाठी पुण्यात आले होते. विजय वेटरचे काम करतात, तर श्रुतीची आई विद्या या भाज्या विकण्याचे काम करतात. या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. पोलीसही या कुटुंबाचे दु:ख पाहून हेलावून गेले आहेत.घटनास्थळावरील हृदयद्रावक चित्र पाहून पोलीस अधिकाºयांनाही अश्रू आवरले नाहीत. श्रुती गायब झाली त्या रात्रीपासून पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत. रविवारी आणि सोमवारी दिवसभर जवळपास सव्वादोनशे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी या तपासाला लागले आहेत. काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कसून चौकशी करायला सुरुवात केली आहे. रविवारी दिवसभरामध्ये २५ जणांकडे चौकशी करण्यात आली असून सोमवारीही १५ पेक्षा अधिक संशयितांकडे चौकशी सुरू होती. दरम्यान, हा गुन्हा जवळच्याच कोणीतरी केल्याचाही दाट संशय पोलिसांना असून त्यादृष्टीने बारकाईने तपास सुरू आहे. एकूणच घटना अत्यंत संवेदनशील असल्यामुळे पोलीसही जबाबदारीपूर्वक आणि काळजीने हे प्रकरण हाताळत आहेत.>घटनास्थळाचा परिसर पिंजून काढलासोमवारी पोलीस सहआयुक्त रवींद्र कदम, अतिरिक्त आयुक्त (दक्षिण विभाग) रवींद्र सेनगावकर, प्रदीप देशपांडे (गुन्हे) उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे, पंकज डहाणे (गुन्हे), सहायक आयुक्त शिवाजी पवार, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुरेश भोसले यांच्यासह विविध पोलीस ठाणी आणि गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाºयांनी घटनास्थळाच्या आसपासचा परिसर पोलीस कर्मचाºयांच्या मदतीने पिंजून काढला.खुन्याचा माग काढण्यासाठी काही धागेदोरे हाती लागतात का, हे बारकाईने तपासण्यात येत आहे. पोलीस अद्याप कोणत्याही निष्कर्षाप्रत आलेले नसून आरोपीला पकडल्यानंतरच घटनेमागील नेमके कारण, आरोपीची मन:स्थिती याबाबतचा उलगडा होऊ शकणार आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करुन कडक शासन करावे, अशी मागणी विविध स्तरांमधून जोर धरू लागली आहे.

टॅग्स :Policeपोलिस