शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंग धोरण अडचणीत; पाच रस्ते निवडणार कसे? वाहतूक पोलीसही अनभिज्ञच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 05:33 IST

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी रात्री तब्बल दीड वाजता वाहनतळ धोरणाचा प्रस्ताव दुरुस्तीच्या उपसूचनेसह मंजूर करून घेण्यात आला. तरीही त्यासाठी दिलेली उपसूचना मोघम असल्यामुळे या धोरणासमोर पुन्हा अडचणीच उभ्या राहण्याची चिन्हे आहेत.

पुणे : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी रात्री तब्बल दीड वाजता वाहनतळ धोरणाचा प्रस्ताव दुरुस्तीच्या उपसूचनेसह मंजूर करून घेण्यात आला. तरीही त्यासाठी दिलेली उपसूचना मोघम असल्यामुळे या धोरणासमोर पुन्हा अडचणीच उभ्या राहण्याची चिन्हे आहेत. कोणते पाच रस्ते, हे त्यात स्पष्ट झालेले नाही तसेच वाहतूक शाखा व पोलीसही या धोरणाबाबत अनभिज्ञच असल्याचे दिसते आहे.रस्त्यावर लावण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना रात्रीचे तसेच दिवसाचेही व तेही दरताशी शुल्क या धोरणानुसार लावले जाणार आहे. त्याला फार मोठ्या प्रमाणावर विरोध झाल्यामुळे व त्यातही खुद्द सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचेच नगरसेवक सहभागी असल्यामुळे पदाधिकाºयांना या धोरणापासून थोडे मागे येणे भाग पडले. त्यानुसार ठरावात दुरुस्तीची उपसूचना मांडण्यात आली. त्यानुसार आता फक्त ५ रस्त्यांवर प्रायोगिक स्तरावर हे धोरण राबवण्यात येईल. सहा महिने धोरणाचा अभ्यास करण्यात येईल. त्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली पक्षनेते व तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येईल.पाच रस्त्यांची नावे निश्चित झालेली नाहीत. पाच प्रमुख रस्ते ठरवले तर मग त्याला सर्वसाधारण सभेची मान्यता घेणार का? यापैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर उपसूचनेत नाही. समितीत कोणते तज्ज्ञ असणार, ते काय अभ्यास करणार, याविषयीही कोणाला काही माहिती नाही.समिती कशासाठी लागते ?वाहनतळासाठी मोकळ्या जागा शोधण्याचा प्रयत्न समिती करणार आहे. त्यासाठी समिती कशाला हेही स्पष्ट होत नाही. आताही प्रशासनासमोर अनेक मोकळ्या जागा आहेत. सोसायट्यांची मोकळी जागा (अ‍ॅमेनिटी स्पेस) सोसायट्या वाहनतळासाठी वापरू देणार आहे का, असाही उपप्रश्न यातून निर्माण होतो. शहराच्या मध्यभागात तर मोकळ्या जागांची वानवाच आहे. मग वाहनतळासाठी जागा शोधणार कुठे? असा सवाल नगरसेवकांकडून होत आहे.धोरण तयार केले त्या वेळी त्यात वाहतूक शाखेच्या तसेच सर्वसाधारण पोलिसांना त्याची माहिती द्यायला हवी होती. सध्या तरी महापालिकेकडे शहरातील पार्किंग झोनची काहीच माहिती उपलब्ध नाही. वाहनतळ, पी वन-पी टू याची काहीच माहिती नसताना धोरण तयार कसे करण्यात आले, असा प्रश्न विरोधकांकडून केलाजात आहे.चर्चा इतकी लांबली की आयुक्त कुणाल कुमार, अतिरिक्त आयुक्त शीतल उगले-तेली यांना अगदी सहजपणे खुर्चीवरच डुलकी लागली. तेच नाही तर सभागृहातही पहिल्या बाकावरचे कर्णे गुरुजी तसेच मागील बाकांवर बसणाºया काही नगरसेवकांनाही थोडा वेळ डुलकी लागली होती. धोरणात बदल करावा लागल्याची खंत आयुक्तांच्या चेहºयावर स्पष्ट दिसत होती.उपसूचना मांडल्यानंतर शुक्रवारी रात्री त्यावर दीड वाजेपर्यंत भाषणे सुरू होती. भाजपा सत्तेत आल्यानंतरच पुणेकर बेशिस्त वागायला लागले आहेत का, असा सवाल काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केला. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी, आम्हाला विकास करायचा आहे, त्यासाठीच काम करतो आहोत. त्यासाठी विरोधकांनी श्रेय घेऊ नये असे म्हणाले. रात्री उपसूचनेचा समावेश करून दुरुस्तीसह या धोरणाचा प्रस्ताव मंजूर झाला.

टॅग्स :Puneपुणे