शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

तुमचे रेकॉर्ड तुम्हीच मोडा - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 06:50 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे गीनिज बुकमध्ये रेकॉर्ड करण्याचे यंदाचे पहिलेच वर्ष आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे गीनिज बुकमध्ये रेकॉर्ड करण्याचे यंदाचे पहिलेच वर्ष आहे. मात्र, सचिन तेंडूलकर स्वत: स्वत:चे रेकॉर्ड मोडत होता तसे विद्यापीठाने पुढील काळात स्वत:चे रेकॉर्ड मोडावे, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले. विद्यापीठाच्या स्वच्छ वारी, स्वस्थ वारी, निर्मल वारी, हरित वारी उपक्रमास त्यांनी शुभेच्छा दिल्या.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या वतीने समर्थ भारत अभियानाअंर्तगत राबविल्या जात असलेल्या ‘रासेयो स्वयंसेवक आळदी ते पंढरपूर एनएसएस वारी’ अभियानाचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विद्यापीठात करण्यात आला. गीनिज बुक रेकॉर्ड मध्ये नोंद व्हावी, या उद्देशाने विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील १६ हजार ७३१ विद्यार्थ्यांना एकाचवेळी कडुलिंबाच्या रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, महापौर मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट, संजय काकडे, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, आमदार माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, दिलीप कांबळे, विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, विद्यापीठाच्या हरित वारी आयोजन समितीचे अध्यक्ष राजेश पांडे, कुलसचिव डॉ. प्रफु ल्ल पवार आदी उपस्थित होते.इतिहासात गीनिज बुकचे पान उघडले जाईल आणि सर्र्वाधिक कडूलिंबाच्या रोपांचे वाटप करण्याचा आणि त्याचे रोपन करण्याचा विक्रम पाहिला जाईल. त्यात पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्याचे नाव सहभागी म्हणून उल्लेख असेल. प्रत्येक विद्यार्थ्याला अभिमानानेया विक्रमाबाबत सांगता येईल,असे सांगून मुख्यमंत्री फडणवीसयांनी स्वच्छ वारी,स्वस्थ वारी,निर्मल वारी, हरित वारी अभियानात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शपथ दिली.लाखो लीटर पाणी वाचवण्याचा निर्धारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा पाच लाख वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप केले जाणार आहे. तसेच वारकऱ्यांना जेवणासाठी अधिकाधिक पत्रावळीचे वाटप करून लाखो लिटर पाणी वाचविण्याचा निर्धार करण्यात आला, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस