शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
6
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
7
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
8
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
9
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
10
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
11
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
12
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
13
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
14
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
15
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
16
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
17
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
18
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
19
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
20
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी

तुळशीबाग लवकरच सीसीटीव्ही नियंत्रणाखाली : मुक्ता टिळक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 18:12 IST

नागरिकांची गर्दी, वाहतूककोंडी,चोरीच्या घटना यामुळे तुळशीबागेत लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देतुळशीबाग विकास समन्वय समितीची स्थापना करण्यात येणार

पुणे : तुळशीबागेतील वाढती दुकानांची संख्या, शहर, गावोगावांच्या कानाकोपऱ्यातून खरेदीचे आकर्षण घेऊन जमणारी प्रचंड गर्दी, यातून घडणाऱ्या चोरीच्या आणि रस्त्यावरच्या वाहतुकीने घेतलेली ‘वाढीव’ जागा या  सगळ्याची दखल घेऊन तुळशीबाग आता लवकरच ‘नजरकैद’ होणार आहे. कारण तुळशीबागेत सीसीटीव्ही बसवण्यात येणार असल्याचे आश्वासन महापौर मुक्ता टिळक यांनी दिले.छोटे व्यावसायिक असोसिएशन पुणे शहर (जिल्हा) यांच्या वतीने जागतिक व्यापार दिनानिमित्त तुळशीबागेतील ज्येष्ठ व्यापारांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिल्पकार विवेक खटावकर, नगरसेवक राजेश येनपूरे, हेमंत रासने, म.न.पा.अतिक्रमण प्रमुख माधव जगताप, रूपाली पाटील, नितीन पंडित, विनायक कदम आदी उपस्थित होते. मुक्ता टिळक म्हणाल्या, रस्त्यावरची, दुकानामध्ये येणाऱ्या नागरिकांची गर्दी त्यामुळे लोकांना चालायला देखील त्रास होतो. या भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यासाठी महापालिकतर्फे हे पाऊल उचलण्यात आले आहे. तसेच ‘आपल्या परिसरातील त्रुटी, विकासाची कामे, समस्या याबाबत व्यावसायिक एकत्रित येऊन महानगरपालिकेला कशाप्रकारे मदत करू शकतील, हे पाहिले पाहिजे. व्यावसायिकांच्या टॅक्स, व्यवसायाच्या जागेसंदर्भातील समस्या मांडल्यास पालिका त्यादृष्टीने नक्कीच मदत करेल. प्रत्येक व्यावसायिकाने आपला व्यवसाय सुयोग्य कसा करता येईल, हे पाहणे गरजेचे आहे.’ नितीन पंडित म्हणाले, ‘दुकानदार, छोटे व्यापारी, पथारीवाले या सर्वांमध्ये समन्वय साधण्यासाठी तुळशीबाग विकास समन्वय समितीची स्थापना करण्यात येणार आहे. या समितीद्वारे व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तुळशीबाग ही राज्यातील आदर्श तुळशीबाग व्हावी यासाठी प्रयत्न करु.’ तुळशीबाग विकास समन्वय समिती, तुळशीबाग छोटे व्यावसायिक असोसिएशन, तुळशीबाग व्यापारी असोसिएशन यांनी उपक्रमात सहभाग घेतला. 

     

टॅग्स :PuneपुणेMukta Tilakमुक्ता टिळकtulsibaugतुळशीबागcctvसीसीटीव्ही