शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

देहू अन् आळंदी युनेस्कोच्या जागतिक अमृत हेरिटेजमध्ये समाविष्ट करावीत: खासदार संभाजीराजे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 19:49 IST

केंद्र सरकारकडे प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन

पिंपरी: संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे देहूगाव आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे आळंदी हे क्षेत्र युनेस्कोच्या जागतिक अमृत हेरिटेजमध्ये समाविष्ट करावीत, यासाठी मी केंद्र सरकारकडे प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी देहू येथे दिले.

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यास संभाजीमहाराज उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. संत तुकाराम महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अनुबंध उलगडताना संभाजी महाराज म्हणाले, ‘‘संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यास आम्हाला बोलावले याबद्दल मी आभार व्यक्त करतो. संत तुकाराम महाराजांनी भक्ती दिली. या भक्तीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले. शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांची गुरुस्थानी मानले होते आणि तुकाराम महाराजांनी सांगितले, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आपला समाज उभा राहिला पाहिजे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी, शाहू महाराज यांनीही हीच भूमिका ठेवली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याला पालखी सोहळ्यात पूजेचा मान मिळाला. आम्ही तुकोबांना अभिवादन करण्यासाठी येथे आलो आहे, अशी आमची भावना आहे.’’.................................संभाजीराजे म्हणाले, ‘‘युनिस्कोमध्ये जागतिक वारसा हक्क मध्ये दोन प्रकार असतात. एक म्हणजे अमृत जागतिक वारसा हक्क आणि दुसरे म्हणजे मृत जागतिक वारसा हक्क. महाराष्ट्रातील जागतिक वारसा हक्क म्हणून तीन स्थळांची नोंद आहे. एक म्हणजे अजंठा- वेरुळची लेणी, दुसरा एलिफंटा आणि तिसरा मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस हे होय. ज्या गोष्टीला स्पर्श करता येत नाही अशा अमृत वारसा हक्क मध्ये नोंद करता येते. वारीला साडे तीनशे वर्षांची परंपरा आहे. या सोहळ्यात २० लाख लोक एकत्र येतात. ही गोष्ट अमृत वारसा हक्क यामध्ये नोंदविली जावी, यासाठी युनेस्कोमध्ये नोंद होण्यासाठी दोन वर्षे अगोदर मी संसदेत विषय मांडला होता. रायगडास मृत वारसा हक्क मध्ये नोंद करण्याबरोबरच देहू आणि आळंदीला मोठी परंपरा आहे. या स्थळांची नोंद अमृत जागतिक वारसा हक्कमध्ये करावी, यासाठी मी प्रयत्न करणार आहे.’’......................घरीच बसून वारी करासंभाजीमहाराज यांनी वारकऱ्यांनी घरीच बसून वारी करावी, असे आवाहन केले आहे. ते म्हणाले, ‘‘कोरोनाच्या संकटात आपण सगळे आहोत. त्यामुळे वारी सोहळ्यावर निर्बंध घातले आहेत. संकटातून बाहेर येण्यासाठी आपण सर्वांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यामुळे यंदाची वारी ही घरीच बसून अनुभवावी. कोरोना गेल्यानंतर पुढील वर्षी आपण मोठ्या उत्साहाने हा सोहळा साजरा करू.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरsant tukaramसंत तुकारामAlandiआळंदी