शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

तुकाराम महाराज पालखी रथाच्या सोन्या, सुंदर बैलजोडीची शारदा गजाननाला मानवंदना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 4:57 PM

गणपती बाप्पा मोरया... ज्ञानोबा माऊली तुकाराम... जयघोषाने मंडई गणपती मंदिर व आजूबाजूचा परिसर दुमदुमून गेला. जगदगुरु  संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी रथाचे यावर्षी आषाढी पालखी सोहळ्यात सारथ्य करणा-या सोन्या, सुंदर या बैलजोडीने शारदा गजानन चरणी अनोखी मानवंदना दिली.

पुणे : गणपती बाप्पा मोरया... ज्ञानोबा माऊली तुकाराम... जयघोषाने मंडई गणपती मंदिर व आजूबाजूचा परिसर दुमदुमून गेला. जगदगुरु  संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी रथाचे यावर्षी आषाढी पालखी सोहळ्यात सारथ्य करणा-या सोन्या, सुंदर या बैलजोडीने शारदा गजानन चरणी अनोखी मानवंदना दिली. देहूकडे प्रस्थान करण्यापूर्वी पुण्यामध्ये या बैलजोडीचे आगमन झाल्यानंतर मंडई मंडळातर्फे स्वागत व पूजन करण्यात आले. 

आंबेगाव बुद्रुक येथील प्रगतीशील शेतकरी रवींद्र बाळासाहेब कोंढरे पाटील यांच्या सोन्या आणि सुंदर या देखण्या बैलजोडीची निवड यंदा पालखी सोहळ्याकरीता करण्यात आली. प्रथमच चिठ्ठी निवड प्रक्रियेने दोन बैलजोडया निवडल्या गेल्या. आंबेगाव बुद्रुक या गावातून प्रथमच तुकोबांच्या पालखीला बैलांचा मान मिळाला. बैलजोडीचे मालक रवींद्र कोंढरे म्हणाले,  ज्या दिवशी आमच्या बैलजोडीची पालखी सोहळ्याकरीता निवड झाली, तो आमच्यासाठी सोन्याचा दिवस उगवला असे वाटले. मंडईतील शारदा गजाननासमोर बैलजोडीचे पूजन झाल्याने आम्हा कुटुंबियांना आनंद झाला आहे.  मंडईमध्ये पूजन झाल्याने आनंद वाटतो. अखिल मंडई मंडळातर्फे मंडईतील शारदा-गजानन मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, विश्वास भोर, बैलजोडीचे मालक रविंद्र्र कोंढरे व कुटुंबीय आदी उपस्थित होते.   अण्णा थोरात म्हणाले, संष्कष्टी चतुर्थीनिमित्त हा बैलजोडी पूजनाचा कार्यक्रम शारदा गजानन मंदिरात आयोजित करण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षांपासून परतीच्या मार्गावर जेव्हा पालख्या असतात, त्यावेळी पुण्यात तुकाराम महाराजांच्या पादुका पूजन होऊन पालखी पुढे रवाना होते. यंदा आगमनाच्या वेळी बैलजोडी पूजनाचा सोहळा झाल्याने आम्हाला आनंद झाला आहे. 

टॅग्स :sant tukaramसंत तुकारामSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाPandharpur Wariपंढरपूर वारी