शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दाजीला मारण्याचा प्रयत्न; बहिणीला त्रास दिल्याबद्दल मेहुण्याचे कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 03:28 IST

बहिणीवर संशय घेतो, या कारणावरून मेहुण्याने दोन साथीदारांच्या मदतीने तिच्या पतीवर कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. 

पुणे : बहिणीवर संशय घेतो, या कारणावरून मेहुण्याने दोन साथीदारांच्या मदतीने तिच्या पतीवर कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत आशिष बसवंत तडवळकर (वय २६, रा़ सदानंद हाईट्स, शंकरनगर, आंबेगाव, कात्रज) हे गंभीर जखमी झाले आहेत.भारती विद्यापीठ पोलिसांनी तडवळकर यांचा मेहुणा अमित दीपक आरडे (वय २६, रा़ मार्तंड हाईट्स, सहकारनगर) व अमोल वेनपुरे या दोघांना अटक केली आहे. लखन जगताप हा पळून गेला आहे़ ही घटना मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास आंबेगाव खुर्द येथील सच्चाईमाता मंदिराशेजारील पाण्याच्या टाकीजवळ घडली.याबाबत, पोलिसांनी सांगितले की, आशिष तडवळकर हा चालक म्हणून काम करतो़ त्याचा अमित आरडे याच्या बहिणीशी प्रेमविवाह झाला आहे़ त्यांना दोन लहान मुले आहेत़ गेल्या काही दिवसांपासून आशिषची पत्नी सारखी मोबाईलवर बोलत असे, यावरून त्यांच्यात वारंवार भांडणे होऊ लागली होती़ मोबाईलवर इतक्या वेळ कोणाशी बोलते, असे विचारून आशिष तिच्यावर संशय घेऊ लागला होता़ त्यावरून त्यांच्या वाद झाल्याने दहा दिवसांपूर्वी ती माहेरी निघून गेली होती. आशिष तडवळकर याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे़ या घटनेची माहिती मिळताच उपायुक्त बच्चनसिंग, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र रसाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार, पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांना अटक केली असून, सहायक पोलीस निरीक्षक डी़ आऱ मदने अधिक तपास करीत आहेत. कोयत्याने केले वारमंगळवारी दुपारी अमित आरडे हा अमोल वेनपुरे, लखन जगताप यांना घेऊन सच्चाईमाता मंदिराजवळील पाण्याच्या टाकीवर गेले़ तेथून अमोल वायेकर याने आशिष याला फोन लावला व तुझा मेहुणा अमित हा त्याच्या मित्रासोबत आला आहे़तू तेथे ये, असे सांगितले़ त्यानुसार आशिष तेथे गेला़ तेव्हा दोघांनी त्याला हाताने मारहाण केली़ अमित आरडे याने दुचाकीच्या डिकीतून कोयते काढले़ त्याने प्रथम आशिष यांच्या डोक्यात कोयता मारला़ त्यानंतर, अमोल वेनपुरे याने त्याला कोयत्याने मारण्यास सुरुवात केली असता, त्याचा वार चुकला व आशिष याच्या डाव्या हातावर वार बसला़ लखन जगताप याने पाठीवर वार केला व ते पळून गेले़

टॅग्स :Puneपुणे