शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

बहुळ येथे भरधाव ट्रकची बससह तीन वाहनांना धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:15 IST

शेलपिंपळगाव : चाकण - शिक्रापूर राज्यमार्गावर बहुळ (ता. खेड) हद्दीतील धावडदरा माथ्यावर भरधाव अवजड ट्रकच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण ...

शेलपिंपळगाव : चाकण - शिक्रापूर राज्यमार्गावर बहुळ (ता. खेड) हद्दीतील धावडदरा माथ्यावर भरधाव अवजड ट्रकच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गंभीर अपघात झाला. अपघातात ट्रकने समोरून येणाऱ्या पीएमपीएलच्या बसला व अन्य तीन चारचाकी कारला धडक दिली. अपघातात बसमधील एका तरुणाच्या शरीरातून एक लोखंडी रॉड आरपार शिरला. सालाबा संभाजी मुंढे (वय २१) असे गंभीर जखमी असलेल्या तरुणाचे नाव आहे. तर अन्य वाहनातील सात ते आठ जण जखमी झाले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडला. चाकण बाजूकडून शिक्रापूर बाजूकडे भरधाव वेगात निघालेल्या ट्रकने (एमएच ४६ डी एम ८४५२) पीएमपीएमएल बससह चारचाकी कार क्र. एमएच १४ एच यू ५५३१, एमएच ४३ बी यू ३८६५, एमएच २० बीएन ०७८९ या तीन वाहनांना धडक दिली. घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहनातील जखमी प्रवाशांना बाहेर काढले. एका चारचाकी वाहनात दोन लहान मुली होत्या, मात्र सुदैवाने त्यांना इजा झाली नाही. मात्र अपघातात पीएमपीएल बसमधील मुंढे नामक तरुणाच्या मांडीतून कंबरेपर्यंत आरपार एक लोखंडी रॉड शिरला.

सदरचा रॉड काढणे शक्य नसल्याने संपूर्ण बस चाकण मधील एका खाजगी रुग्णालयात आणण्यात आली. याठिकाणी लोखंडी कटरच्या साह्याने हा रॉड कापण्यात आला. त्यानंतर तरुणाच्या शरीरातून आरपार झालेला लोखंडी रॉड ऑपरेशन करून काढण्यासाठी त्याला रुग्णालयात रात्री उशिरा दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर सदरचा ट्रक व अन्य वाहने रस्त्यालगतच्या चारीमध्ये पलटी झाली आहेत. रविवारी उशिरापर्यंत अपघातग्रस्त वाहने घटनास्थळी त्याच स्थितीत आहेत.

फोटो ओळ : बहुळ (ता. खेड) हद्दीतील धावडदरा माथ्यावर झालेला अपघात.