शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खंडाळ्याजवळ मालगाडीचे डबे घसरले, पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 19:06 IST

खंडाळ्याजवळ मालगाडीचे डबे घसरल्यामुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. मालगाडीचे डबे रुळावरून खाली उतरल्यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

पुणे, दि. 7 - खंडाळ्याजवळ मालगाडीचे डबे घसरल्यामुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. मालगाडीचे डबे रुळावरून खाली उतरल्यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.  खंडाळा येथे गेट क्रमांक 19 जवळची घटना घडली आहे. कोल्हापूर, पुणे, सोलापूरच्या दिशेनं जाणा-या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी-पुणे प्रगती एक्स्प्रेस रद्द केली आहे. सीएसएमटी- डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, पुणे-इंद्रायणी एक्स्प्रेस, सीएसएमटी-लातूर एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. तर सह्याद्री, महालक्ष्मी एक्स्प्रेसचा खोळंबा झाला आहे.  मुंबईच्या दिशेनं येणारी वाहतूकही उशिरानं सुरू आहे.मुंबई-पुणे लोहमार्गावर खंडाळा घाट चढून आल्यानंतर खंडाळा रेल्वे स्थानकाजवळ अचानक मालगाडीचे डबे घसरल्याने पुणे व मुंबई दोन्ही बाजूकडील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. पुण्याजवळ खंडाळा येथे मालगाडी घसरल्याने मिरज-मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. मिरजेकडून मुंबईला जाणाऱ्या चालुक्य एक्सप्रेस व हुबळी-लोकमान्य टिळक टर्मिनस या दोन्ही एक्स्प्रेस, महालक्ष्मी व सह्याद्री एक्सप्रेस या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. मुंबईतून कोल्हापूरला येणाऱ्या महालक्ष्मी व सह्याद्री एक्सप्रेसही रद्द झाल्या आहेत.मिळालेल्या माहितीनुसार डाऊन मिडल लाईनने पुण्याकडे येणारी मालगाडी खंडाळ्यातील किमी 123 व 124 दरम्यान आली असता मालगाडीचे दोन डबे रुळावरुन घसरल्याने अप व डाऊन दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. या घटनेमुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या विविध रेल्वे स्थानकांवर थांबविण्यात आल्या आहेत. रेल्वेचे अधिकारी व कामगार घटनास्थळी पोहोचले असून, डबे बाजूला घेण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे समजले. मदतीसाठी पुणे स्टेशनवरही तुम्ही संपर्क साधू शकता, 02026105899, 02026059002 या नंबरवर फोन करण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे. 

खंडाळा घाटमार्गावर रेल्वेची मालगाडी घसरल्यामुळे मुंबई-पुणे मार्गावरची रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे रेल्वेकडून दुपारनंतर सुटणा-या अनेक मेल एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे, कोल्हापूरकडे जाणा-या रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीने छ.शिवाजी महाराज स्टेशन, दादर, कल्याण व कर्जत येथून जादा बसेस सोडल्या आहेत.