शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
2
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
3
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
4
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
5
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
6
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
7
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
8
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
9
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
10
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
11
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
12
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
13
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
14
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
15
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
16
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
17
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
18
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
19
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
20
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )

त्रिवेणी संगमावर दीपोत्सव, भीमा-भामा इंद्रायणीचा तट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 00:49 IST

भगव्या झेंड्याचे दिमाखदार फडकणे... ठिकठिकाणी आकाशकंदिलाचा झगमगाट आणि हजारो लखलखत्या पणत्यांनी उजळून निघाला भीमा-भामा-इंद्रायणी त्रिवेणी संगम आणि संगमेश्वर मंदिर व छत्रपती संभाजी महाराज समाधी परिसर.

लोणी कंद : भगव्या झेंड्याचे दिमाखदार फडकणे... ठिकठिकाणी आकाशकंदिलाचा झगमगाट आणि हजारो लखलखत्या पणत्यांनी उजळून निघाला भीमा-भामा-इंद्रायणी त्रिवेणी संगम आणि संगमेश्वर मंदिर व छत्रपती संभाजी महाराज समाधी परिसर.तुळापूर (ता. हवेली) येथील छत्रपती संभाजीराजेंच्या ऐतिहासिक बलिदानस्थळी शंभुशौर्य दिपोत्सव सोहळा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आमदार नितेश राणे व आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रदीप कंद, गणपत फुलवरे, हरकचंद्र ढोका, इतिहासतज्ञ दत्तात्रय नलावडे, मनसे जिल्हाध्यक्ष संदिप सातव, मिलिंद हरगुडे, दिपक गावडे, सरपंच गणेश पुजारी, उपसरपंच राहुल राऊत उपस्थित होते.यावेळी स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आमदार नितेश राणे यांनी शिवसेना व सरकारच्या धोरणांवर टिका केली. छत्रपती संभाजी महाराजांची कामगिरी उत्तुंग व अभिमानास्पद असूनही त्यांचा खरा इतिहास लपवून पुस्तकाद्वारे त्यांच्या बदनामीच्या होणाऱ्या प्रयत्नांना पायबंद घालण्याचे काम सध्याच्या पिढीने करावे, असे आवाहनही त्यांनी केले. तर आमदार बाबुराव पाचर्णे यांनी सरकारची विकासाची भुमिका मांडत वढु बुद्रुक व तुळापूरची ऐतिहासिक स्थळे जोडणारा प्रशस्त पुल शासन उभारत असून या परिसरात होत असलेल्या विकास कामांचाही आढावा त्यांनी घेतला.आयोजक शेखर सक्करगे पाटील, सचिन जाधव, शंकर जाधव व सहकाºयांनी शंभु भक्तांसमवेत शंभुराजांच्या समाधी स्थळी जागोजागी दीप प्रज्वलनाने मराठमोळ्या पद्धतीने दीपोत्सव साजरा केला. यावेळी पंचक्रोशीतून युवावर्ग मोठ्या उत्साहाने सहभागी झाला होता. संतोष शिवले यांनी आभार मानले.ऐतिहासिक भूमीत दिवाळीनिमित्ताने आयोजित केलेल्या दीपोत्सव कार्यक्रमासाठी येसाजी कंक याचे वंशज आकाशराजे कंक, धनाजी जाधव यांचे वंशज अमरसिंहराजे जाधवराव, निंबाळकर राजघराण्यातील शिवरूपराजे खर्डेकर यांची उपस्थिती लाभल्याने कार्यक्रमाला एक उंची आली होती.

टॅग्स :DiwaliदिवाळीPuneपुणे