शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

शंकर सारडा श्रध्दांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:02 IST

- डॉ. श्रीपाल सबनीस, माजी संमेलनाध्यक्ष ----------------------------- सारडा हे गेल्या पिढीतले अत्यंत उत्तम समीक्षक होते. वृत्तपत्रातील स्तंभलेखनाच्या जागेची मर्यादा ...

- डॉ. श्रीपाल सबनीस, माजी संमेलनाध्यक्ष

-----------------------------

सारडा हे गेल्या पिढीतले अत्यंत उत्तम समीक्षक होते. वृत्तपत्रातील स्तंभलेखनाच्या जागेची मर्यादा सांभाळून त्यांनी आस्वादक समीक्षा फार चांगली केली. मराठीबरोबरच पाश्चिमात्य साहित्याचा परिचयही त्यांनी मराठी वाचकांना करून दिला. लेखकांचे मर्म उलगडून दाखवणे, त्यांच्या साहित्याचा परिचय करून देणारे ते समीक्षक होते. ते अत्यंत उत्साही, स्वागतशील आणि साक्षेपी होते.

- डॉ. रेखा साने-इनामदार, समीक्षिका

-------------------------

शंकर सारडा हे मोठे समीक्षक आणि बालसाहित्यकार होते. मध्यंतरी अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे त्यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. सारडा यांचा सल्ला नेहमी उपयोगी पडत असे. अनेक कार्यक्रमात आम्ही एकमेकांना भेटत असू. त्यांच्या सांगण्यावरून मी कविता पाठवल्या, त्यांचे संग्रही प्रकाशित झाले आहेत. उत्तम समीक्षक म्हणून ते नेहमीच आठवणीत राहतील.

- डॉ. संगीता बर्वे, बालसाहित्यकार

------------------

शंकर सारडा नव्या लेखकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. नव्या कवींनाही त्यांनी कायम प्रोत्साहन दिले. ते शोधक वृत्तीचे लेखक आणि उत्तम समीक्षक होते. त्यांच्या जाण्याने समीक्षा क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

- डॉ. नागनाथ कोतापल्ले, माजी संमेलनाध्यक्ष

--------------------

मेहता पब्लिकेशनतर्फे त्यांचे ‘ग्रंथविशेष’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले होते. आमच्या प्रकाशन संस्थेचे ते मार्गदर्शक आणि आधारस्तंभ होते. त्यांची ‘आऊट आॅफ प्रिंट’ झालेली काही पुस्तके आम्ही नुकतीच प्रकाशित केली. आमच्या ‘ग्रंथजगत’ या हाऊस मॅगझिनचे ते संस्थापक होते. विक्री, सवलत, निर्मितीमूल्य याबाबत त्यांनी कायम मोलाचे मार्गदर्शन केले. जगभर फिरलेले असल्याने त्यांना अनेक विषयांची सखोल जाण होती.

- सुनील मेहता, प्र्रकाशक

------------------------

दिलीपराज प्रकाशनाचे पहिल्या दिवसापासूनचे हितचिंतक, आमच्या परीक्षक समितीचे प्रमुख, आमचे लेखक आणि ज्येष्ठ समीक्षक शंकर सारडा यांचे दु:खद निधन झाले, ही अत्यंत क्लेशदायक बातमी आहे. ते माझे अत्यंत जवळचे मित्र, मार्गदर्शक होते. त्यांच्या बरोबरच्या अनेक आठवणी आज मनापुढे रुंजी घालत आहेत. अफाट वाचन, लेखन आणि सतत ग्रंथांच्या सानिध्यात असणारे सारडा सर्वांना मदत करणारे आणि सर्वांचे मित्र होते. लेखक, पत्रकार, संपादक आणि समीक्षक असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व लाभलेला एक चांगला माणूस आज काळाने हिरावून नेला. मराठी साहित्यविश्वाची ही खूप मोठी हानी आहे.

- राजीव बर्वे, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ