शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

औषधी रोपांच्या लागवडीतून आदिवासी तरुणांची कोट्यावधींची उलाढाल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 14:47 IST

२७ वर्षीय सुनील पवारचे यश: सावित्रीबाई फुले विद्यापीठाने दिले प्रशिक्षण

पुणे- सुरुवातीला काही मित्रांसोबत पूजा पत्री, समिधा विकणाऱ्या एका आदिवासी तरुणाने औषधी वनस्पती लागवडीच्या प्रशिक्षणाच्या आधारे कोट्यवधीमध्ये व्यवसाय केला आहे. आज यामुळे आदिवासी भागातील १८०० लोकांना रोजगारही प्राप्त झाला आहे. 

सुनील पवार हे मूळचे ठाणे जिल्ह्यातील असून त्यांचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. सुरुवातीला छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्यानंतर त्यांनी जंगलातून पूजेसाठी लागणाऱ्या वनस्पती गोळा करण्याचे काम हाती घेतले. त्यातून थोडा फार पैसा हाताला लागत त्यातून ते स्वतःचा खर्च भागवत. मात्र एका कार्यक्रमात त्यांना आयुष मंत्रालयातर्गत येणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्थापन केलेल्या पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सुविधा केंद्राविषयी माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी या विभागातून औषधी वनस्पतींची लागवड कशी करावी याचे प्रशिक्षण घेतले. तो कोरोना काळ असल्याने त्याच काळात गुळवेलला मोठी मागणी निर्माण झाली होती. त्याच वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानेही गुळवेल प्रकल्प हाती घेतला होता. त्या वर्षी पवार यांनी ३४ टन गुळवेलची विक्री केली. तर यंदाचे वर्ष पूर्ण होण्याआधीच जानेवारी ते जून महिन्यात १०० टन गुळवेलची निर्मिती झाली आहे. 

विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभागीय केंद्राचे संचालक डॉ. दिगंबर मोकाट म्हणाले, या काळात गुळवेलचं उत्पादन कसं घ्यावं, त्याची साठवणूक कशी करावी तसेच त्याची विक्री कुठे करावी याबाबत त्यांना प्रशिक्षण दिले. त्यानुसार त्यांना अनेक आयुर्वेदिक उत्पादन करणाऱ्या संस्थांशी जोडून दिले. आज डाबर, हिमालया, वैद्यनाथ यासारख्या नामांकित कंपन्यांना अनेक औषधी वनस्पती सुनील पुरवतो. यासाठी त्याने आदिवासी एकात्मिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ६ केंद्र सुरू केली असून त्यात १८०० आदिवासी काम करतात. ज्या आदिवासी नागरिकांना रोज १०० रुपये मिळायचे ते आज यात काम करून ३०० ते ४०० रुपये रोज मिळवतात असेही पवार यांनी सांगितले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर याविषयी म्हणाले ,"औषधी वनस्पतीची शेती ही काळाची गरज आहे. अनेक लोक ही शेती करतात मात्र योग्य मार्गदर्शन मिळाले तर व्यक्ती कुठे पोहोचू शकतो हे या उदाहरणावरून स्पष्ट होते. विद्यापीठात या औषधी वनस्पतीबाबत मोठ्या प्रमाणात काम सुरू असून समाजाला याचा उपयोग होतो आहे."

 

टॅग्स :medicineऔषधंStudentविद्यार्थीPune universityपुणे विद्यापीठ